Loading ...
/* Dont copy */

मी फूल तृणातील इवले - मराठी कविता (मंगेश पाडगांवकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मंगेश पाडगांवकर यांची मी फूल तृणातील इवले ही लोकप्रिय मराठी कविता.

मी फूल तृणातील इवले - मराठी कविता (मंगेश पाडगांवकर)

जरि तुझिया सामर्थ्याने, ढळतील दिशाही दाही


मी फूल तृणातील इवले - मराठी कविता (मंगेश पाडगांवकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मंगेश पाडगांवकर यांची मी फूल तृणातील इवले ही लोकप्रिय मराठी कविता.



जरि तुझिया सामर्थ्याने
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणातील इवले
उमलणार तरिही नाही

शक्तीने तुझिया दिपुनी
तुज करितील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचे पाते
अन् स्वत:स विसरून वारा
जोडील रेशमी नाते

कुरवाळीत येतील मजला
श्रावणांतल्या जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करतिल सजल इषारा

रे तुझिया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे?
अन् रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुंफावे

येशिल का सांग पहाटे
किरणांच्या छेडित तारा
उधळीत स्वरांतुन भवती
हळु सोनेरी अभिसारा

शोधीत धुक्यातुन मजला
दवबिंदू होउनि ये तू
कधी भिजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधित हेतू

तू तुलाच विसरुन यावे
मी तुझ्यात मज विसरावे
तू हसत मला फुलवावे
मी नकळत आणि फुलावे

पण तुझिया सामर्थ्याने
ढळतील दिशा जरि दाही
मी फूल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही

- मंगेश पाडगांवकर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची