Loading ...

आईची महती (मराठी कविता)

आईची महती (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री पूजा चव्हाण यांची आईची महती ही कविता.

आईची महती (मराठी कविता)

आई आभाळाचं मन, आई सर्वात मोठं धन


आईची महती (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री पूजा चव्हाण यांची कविता ‘आईची महती’.



आई आभाळाचं मन
आई सर्वात मोठं धन

न्यारीच असते आईची प्रीती
किती वर्णावी तिची किर्ती
आई ममतेची मौल्यवान मुर्ती
मी आज गाते ही आईची महती

आईची माया आभाळभर
आई ज्ञानाचा सागर
आई देवीचा जागर
जसे सुखाचे आगर

आई सुखाचा महाल
आई धगधगती मशाल
संकटात होते ती लेकराची ढाल
तिची कुशी वाटे उबदार शाल

आई निथळ पाण्याची घागर
आई जीवनाचा सार
आई तलवारीची धार
करते शब्दांचा ती वार

आई देवापुढची ज्योत
आई जळणारी वात
राहते अखंड तेवत
आई प्रेमाचं दैवत

आई गोड रानमेवा
ज्याकडे नाही त्यास तिचा हेवा
थकलेल्या जीवनाचा तिच्या कुशीचा विसावा
अविरत करावी आपण आईची सेवा

- पूजा चव्हाण

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची