Loading ...

श्रद्धेचा चिखल (कुठेतरी-काहीतरी)

श्रद्धेचा चिखल (कुठेतरी-काहीतरी) - एका कलाकारासाठी कुठलीच कला कधीच बाद होत नाही; कला अजरामर असते [Shraddhecha Chikhal].

श्रद्धेचा चिखल (कुठेतरी-काहीतरी)

आपल्या डोळ्यांना न बघवणारा पण तरीही दिसत राहणारा हा श्रद्धेचा चिखल

श्रद्धेचा चिखल (कुठेतरी-काहीतरी)

(Shraddhecha Chikhal) मस्तपैकी नदीत पाय टाकून मी शांत बसले होते या मुर्त्यांकडे बघत (मनात म्हंटलं, ओऽऽऽह त्तेरी... तुम्हारा भी यही हाल हैं क्या?).

कित्येक वर्षांपासून कित्येकांनी याच देवांना डोळे भरून पाहण्यासाठी पायपीट केली असेल, येथे माथा टेकला असेल, आपली करुणा भाकली असेल, नवस बोलले असतील, हार फुलं प्रसादासाठी पदरमोड केली असेल, उपवास धरले असतील, डोकं आपटले असेल, लोटांगण घातले असतील, आरत्या ओवाळल्या असतील, भजनं गायली असतील याच देवांसाठी ज्यांना... जाऊ द्या.

पैठण च्या गोदावरी धरणाजवळील दगडी मूर्ती
पैठण च्या गोदावरी धरणाजवळील भग्न अवस्थेतील दगडी मूर्ती

यांच्या ऐवजी आता मंदिर संस्थानिकांनी मंदिराचा जीर्णोद्धार म्हणून सारं नवं काम केलंय. त्यामुळे शेकडो वर्षांपासून लोकांनी नमस्कार करून करून झिजवलेल्या या दगडांचं तिथे आता काही काम नसेल. मग पवित्रता भंग न होता विल्हेवाट कशी लावायची तर नदीपात्रात सोडून द्यायचं, म्हणजेच विसर्जित करायचं... ट्रकाने भरून! नदी सर्व वाहून नेते पुरात, (तिला काय, कामच आहे तिचं... तिचं बाकी काहीही होवो) तसंही भंगलेलं ठेवू नये त्यांची पुजा वर्ज्य असते असं शास्त्रय (माणसाचं)

डोळे सुन्न करणारं दृष्य

असो, माझ्या रिकाम्या डोक्याला आणि डोळ्यांना हे सारं फार सुन्न करणारं वाटलं. एवढाच पर्याय होता का? दुसरी कुठलीच कल्पना आली नसेल का संस्थानिकांच्या डोक्यात. मला तर वाटत होतं सारं घेऊन यावं आपल्या घरी पण पण... खबरदार, आपण जर असं केलं तर तो गुन्हा होतो बरं का! लक्षात ठेवा, असंच आहे हे! त्यापेक्षा वाहिलेलं बरं.

आता हलल्याच बिचाऱ्या जागेवरून अन्‌ गेल्याच प्रवाहात वाहून तर काय होईल? पुन्हा कुठेतरी, कुणालातरी सापडतील अन्‌ पुन्हा कोणीतरी शेंदूर फासील... चालू द्या... नाहीतर आपल्या डोळ्यांना दिसत राहीलंच जाऊ तेव्हा; श्रद्धेचा चिखल.

असो, आपण एकच लक्षात ठेवायचं असतं, देव चराचरात वसलेला आहे. जळी तळी सर्वत्र... माणसांत सोडून... एका कलाकारासाठी कुठलीच कला कधीच बाद होत नाही. कधीच मरत नाही. कला अजरामर असते.

पैठण च्या गोदावरी धरणाजवळ वाळू चाळणाऱ्या मायलेकी
पैठण च्या गोदावरी धरणाजवळ वाळू चाळणाऱ्या मायलेकी

हे फार भयंकर होतं, ह्या मायलेकी पहाटेपासून तर सुर्य डोक्यावरून कलेपर्यंत अन्‌ पुन्हा उसंत घेऊन सायंकाळ कलेस्तोवर एकसारखं नदीपात्रात घाम गाळून वाळू वाळू चाळतांना... रुपया रुपया वेचतांना!

- नमिता प्रशांत

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची