Loading ...

सैनिका मी स्वागत करतो (मराठी कविता)

सैनिका मी स्वागत करतो (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अरविंद थगनारे यांची सैनिका मी स्वागत करतो ही कविता.

सैनिका मी स्वागत करतो (मराठी कविता)

सैनिका मी स्वागत करतो, गळा घालूनी हार


सैनिका मी स्वागत करतो (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अरविंद थगनारे यांची कविता ‘सैनिका मी स्वागत करतो’.



सैनिका मी स्वागत करतो
गळा घालूनी हार
न मानलीस तू शत्रूपक्षास
शरण येऊनी हार

पहात पहात तुझे शौर्य
अस्तास गेला सुवर्ण गोळा
तमा नसे तुजला कधी
ग्रास घेईल तोफेचा गोळा

स्वग्रहीचा रहिवास तो
वाटे तुजला हवा
माता पित्याचा प्रियजनांचा
निरोप देते स्वग्रामीची हवा

युध्दभूमीवर मन तुझे ते
युध्दात अति रंगले
कणखर काटक शरीर तुझे रे
रक्ताने रंगले

धरणीमातेस हवा तुझा रे
नित्याचा वास
दरवळू दे चोहीकडे
तुझ्या शौर्याचा वास

भूमातेचे रक्षण करणे
हाच तुला रे सदैव नाद
सळसळ करते रक्त तुझे रे
ऐकूनी रणशिंगाचा नाद

जीवनान्त होईपर्यंत
केली भूमातेची रक्षा
वार्‍यासंगे स्रोत बनूनी उर्जेचा
पसरली भूवरी देहाची रक्षा

- अरविंद थगनारे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची