Loading ...

गणबा विनकर (मराठी कविता)

गणबा विनकर (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अरविंद थगनारे यांची गणबा विनकर ही कविता.

गणबा विनकर (मराठी कविता)

गणबा विनकर चोळीत आला, तंबाखूला चूना


गणबा विनकर (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अरविंद थगनारे यांची कविता ‘गणबा विनकर’.



गणबा विनकर चोळीत आला
तंबाखूला चूना
हातावरती थाप मारूनी
म्हणतो तंबाखू खा ना

तिरकस टोपी हाती काठी
खांदी रूळतो रूमाल
खेळणार्‍या पोरांचा
उगीच धरतो गाल

झटका देऊन मानेला मग
मनाशीच म्हणतो
लुबाडूनी या भोळ्या लोका
पाटील बुरूजावर राहतो

आडावरती बाया बापड्या
गुमान पाणी भरती
त्यांना पाहून पचकन थुंकून
म्हणतो माझी दिसली का शेवंती?

धोतर सावरीत मान हलवीत
जातो पारावरती
रामराम करूनी म्हणतो
झाली का दिपारती?

मिशीवरती ताव मारीत
मिचकावीत डावा डोळा
सोनाराशी पुसता झाला
सोने काय तोळा?

- अरविंद थगनारे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची