Loading ...

काशीतील धुंडिराज गणेश (गणपतीच्या गोष्टी)

काशीतील धुंडिराज गणेश (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला धुंडिराज गणेश हे नाव कसे पडले? त्याचीच ही रंजक गोष्ट.

काशीतील धुंडिराज गणेश - गणपतीच्या गोष्टी | Kashitil Dhundiraj Ganesh - Ganpati Stories

आपल्या लाडक्या बाप्पाला ‘धुंडिराज गणेश’ हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट


काशीतील धुंडिराज गणेश (गणपतीच्या गोष्टी)

मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांना आपण अनेक नावांनी ओळखतो. त्यापैकीच एक नाव आहे ‘धुंडिराज गणेश’. पण हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच ही गोष्ट.



पूर्वी कश्यपऋषींनी विष्णूच्या आज्ञेने आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने चार प्रकारची जीवसृष्टी निर्माण केली. नंतर दीन, दुबळ्या व पंगू लोकांच्या उद्धारासाठी ऋषींनी आणि देवांनी अनेक तीर्थे निर्माण केली आणि अशा प्राण्यांना तात्काळ मुक्ती मिळण्याकरिता वाराणसी क्षेत्र शंकराने स्थापिले. प्रलयकाळी या वारणसीचे रक्षण करण्यासाठी शंकर तिला आपल्या त्रिशुळावर धारण करतात. काशीक्षेत्र हे हिंदूचे सर्वात प्रिय क्षेत्र काशीस जावे । नित्य वदावे ॥ मनापासून अशी इच्छा असली, तर ती यात्रा कधीतरी घडतेच.

महादेवांनी भस्मासूर राक्षसाला विष्णूकडून मोहिनीरुपाने ठार केले होते. त्याचा सूड घेण्यासाठी भस्मासुराचा मुलगा दुरासद याने कठोर तपश्चर्या केली. तेव्हा शंकराची प्रसन्न होऊन त्यास ‘एका शक्तीवाचून तुला मारण्यास कोणीच समर्थ होणार नाही.’ असा वर दिला.
शंकराच्या वराने मत्त झालेल्या दुरासद राक्षसाने त्रिभुवनात हाहाःकार माजवला. सर्व त्रिभुवन जिंकून झाल्यावर काशीक्षेत्र जिंकून घेण्यासाठी तो विमानाने काशीत आला. काशीतील देवपूजा, व्रते, नित्यकर्मे त्याने बंद करविली. जिकडे तिकडे अधर्म पसरला.

तेव्हा सर्व देव शंकर-पार्वतीस शरण गेले. तेव्हा पार्वतीच्या नेत्रांमधून एक अलौकिक तेज बाहेर पडले. त्या तेजामधून वस्त्रालंकार व दोन दातांसह शुंडदंडाने निराजमान अशी विनायकाची मूर्ती प्रगट झाली. देवांनी या विनायकाचे नाव ‘वक्रतुंड’ असे ठेवले.

देवांना धीर देऊन तो ‘वक्रतुंड विनायक’ सिंहावर आरुढ झाला व दुरासद दैत्याशी युद्ध करु लागला. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. गजाननाने आपले विराट स्वरुप प्रकट केले आणि त्या राक्षसाची शेंडी धरली, नंतर एक पाय काशी नगरामध्ये आणि दुसरा त्या राक्षसाच्या मस्तकावर ठेवून गजानन त्याला म्हणाले, ‘अरे दुष्टा, महादेवांच्या वरदानामुळे तुला मृत्यू येणार नाही, हे मला माहीत आहे. यासाठी तू पर्वताचे रुप धारण करुन या नगरीसमीप स्तब्ध पडून रहा व या नगरीचे रक्षण कर.’ हे ऐकून तो दैत्य आनंदाने म्हणाला, ‘गजानना, तू जर आपला पाय सदोदित माझ्या मस्तकावर ठेवून असाच काशीसमीप उभा राहशील तर मी येथून कुठेही जाणार नाही.’ गजाननाने राक्षसाचे हे बोलणे मान्य केले. अद्यापि गजानन वास करीत आहे.

गजाननाने दुरासदाचा वध केल्यावर देवांनी त्याची स्तुती केली. ‘नित्यनेमाने तुझी पूजा करणारे, तुझाच शोध करीत असतात. ‘ढुंढि’ या शब्दाचा अर्थ ‘शोध करणे’ असा आहे. ‘ढुंढि’ या नावाने तू लोकांमध्ये प्रसिद्ध होशील. तुला लोक ‘ढुंढिराज’ असे म्हणतील. तुझे दर्शन, पूजा, ध्यान व स्मरण ही धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चतुर्विध पुरुषार्धाची साधने होतील.’ अशा प्रकारे गजाननाची स्तुती करून देवांनी मंदारपुष्पांनी व शमीपत्रांनी विनायकाची पूजा केली.

सर्व लोकांनी मोठा समारंभ केला. काशीत ‘धुंडिराजाची’ स्थापना केली. त्याला धुंडिराज या नावानेच ओळखू लागले. त्याचं उत्तम मंदिर बांधले. काशीतील ‘धुंडिराज गणेश’ सर्वांची दुःख दूर करु लागला. लोक सुखासमाधानाने राहू लागले. धुंडाळण चुकवतो तो धुंडिराज.


काशीतील धुंडिराज गणेश (गणपतीच्या गोष्टी) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची