Loading ...

गणपतीस श्रीगणेश म्हणू लागले (गणपतीच्या गोष्टी)

गणपतीस श्रीगणेश म्हणू लागले (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या गणपतीला श्रीगणेश का म्हणू लागले? त्याचीच ही रंजक गोष्ट.

गणपतीस श्रीगणेश म्हणू लागले - गणपतीच्या गोष्टी | Ganpatis ShriGanesh Mhanu Lagale - Ganpati Stories

आपल्या लाडक्या गणपतीला श्रीगणेश का म्हणू लागले? त्याचीच ही रंजक गोष्ट


गणपतीस श्रीगणेश म्हणू लागले (गणपतीच्या गोष्टी)

मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांना आपण अनेक नावांनी ओळखतो. त्यापैकीच एक नाव आहे ‘श्रीगणेश’. पण हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच ही गोष्ट.



कैलास पर्वतावर शंकर-पार्वती गजाननासह वास्तव्य करत होते, तेव्हाची ही कथा.

एकदा शंकर निद्रिस्त असता जवळच बालगणपती खेळत होते. खेळता खेळता त्याचे लक्ष शंकराच्या मस्तकावरील चंद्राकडे गेले. त्याने लगेचच तो चंद्र काढून खेळावयास घेतला. त्या चंद्राशी खेळत-खेळत बालगणपती दूरवर गेले.

थोड्या वेळाने शंकर जागे झाले. जागे झाल्यावर पाहतात तो काय? त्यांना आपल्या मस्तकावरील चंद्र नाहीसा झाल्याचे आढळले. तेव्हा त्यांनी नंदी व आपले गण यांना बोलावून घेतले आणि चंद्राबद्दल विचारले. तेव्हा गणांनी चंद्र गणपतीच्या हातात पाहिल्याचे सांगितले. तेव्हा शंकरांनी गणपतीकडून चंद्र घेऊन येण्यास नंदी व गणांना फर्मावले. हुकूमाप्रमाणे गण आणि नंदी निघाले गणपतीकडून चंद्र आणण्यास!

एके ठिकाणी त्यांना गणपती चंद्राशी खेळताना दिसला त्याला ते धरावयास जाणार इतक्यात गणपती एकदम गुप्त झाला आणि दूरवर गणांच्या व नंदीच्या दृष्टीस पडला. तेथे ते गणपतीस पकडावयास गेले तर पुनः गणपती गुप्त झाला. अशाप्रकारे एकदा गुप्त होऊन तर एकदा प्रगट होऊन, एकदा अतिशय जड होऊन तर एकदा आपल्या श्वासाबरोबर गणांना व नंदीला गणपतीने जर्जर केले. शेवटी त्यांच्या शक्तीची घमेंड उतरल्यावर गण थकलेले पाहताच गणपती त्यांना शंकराच्या पायाशी बसलेला आढळून आला आणि चंद्रही शंकराच्या मस्तकावरच होता. हा चमत्कार पाहून गण व नंदी शंकरास म्हणाले, “अहो शंकर, चंद्र तर आपल्या मस्तकीच आहे!”

हे ऐकून शंकरांनी मस्तकावर हात लावून पाहिले तर खरेच, चंद्र जागच्या जागीच होता. त्या दिवसापासून गणपतीच्या बाललीलांचा चमत्कार पाहून शंकराच्या गणांना गणपतीच्या अफाट सामर्थ्यांची कल्पना आली आणि ते गणपतीच्या आज्ञेत वागू लागले. म्हणून लोक त्यांना गणांची अधिपती ‘गणपती’ किंवा गणांचा ईश्वर म्हणजेच ‘गणेश’ म्हणू लागले.

गणपतीस श्रीगणेश म्हणू लागले (गणपतीच्या गोष्टी) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची