Loading ...
/* Dont copy */

गणपतीला दुर्वा आवडतात (गणपतीच्या गोष्टी)

गणपतीला दुर्वा आवडतात (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला ‘दुर्वा’ आवडत्या होण्याचे काय कारण असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट.

गणपतीला दुर्वा आवडतात - गणपतीच्या गोष्टी | Ganpatila Durva Aavadtat - Ganpati Stories

आपल्या लाडक्या बाप्पाला ‘दुर्वा’ आवडत्या होण्याचे काय कारण असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट


गणपतीला दुर्वा आवडतात (गणपतीच्या गोष्टी)

मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांना ‘दुर्वा’ प्रिय आहेत हे माहितेय. पण दुर्वा का आवडत्या झाल्या त्याचीच ही गोष्ट.



गणपतीला दुर्वा आवडतात

मित्रांनो! गणपतीला दुर्वा का प्रिय झाल्या हे आपण मागील कथेत पाहिले. परंतु दुर्वा गणपतीच्या आवडत्या होण्याची आणखी एक कथा आहे.

ब्रह्मदेवाने चराचर सृष्टीची निर्मिती केली. मग या सृष्टीच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काय करावी. असा प्रश्न त्याला पडला. तेव्हा त्याने श्रीगणेशाची आराधना सुरू केली. श्रीगणेशाचे ध्यान करीत असता त्याच्याच शरीरातून अनेक हातपाय, पुष्कळ तोंडे आणि खूप डोळे असलेली एक सुंदर देवी निर्माण झाली. ही देवीच सर्वांचे पोषण करील असे ब्रह्मदेवाला ज्ञान झाले. तेव्हा त्याने तिला आशिर्वाद दिला. ‘तू तप कर आणि श्रीगणेशाला प्रसन्न करून सर्वांचे अन्न हो. तुला दुर्वा हे नाव मिळेल.’

या देवीने मग श्रीगणेशाला आपल्या तपाने प्रसन्न करून घेतले. तेव्हा तिच्या मस्तकातून षडरसयुक्त स्वर्गान्न निर्माण झाले. पोटातून पृथ्वीवरच्या सजींवासाठी सुरस अन्न निर्माण झाले. पाताळातील लोकांसाठी तिच्या पायांपासून अन्न निर्मिती झाली. अशा तऱ्हेने तिन्ही लोकांतील चराचर सृष्टीस अन्नप्राप्ती होऊन तिन्ही लोक पुष्ट झाले आणि या चराचरसृष्टीचा अनेक ब्रह्मदेवाला आनंद झाला. प्रसन्न होऊन त्याने तिला अन्नाची अधिष्ठात्री केले.

काही काळ लोटल्यावर या दुर्वा देवीला आपल्या ऐश्वर्याचा गर्व झाला. ती जगदंबा पार्वतीशीच स्पर्धा करू लागली. ती उन्मत्तपणे तिन्ही लोकांत ‘अन्नपूर्ण’ मीच आहे. कारण मी अन्नस्वरुप आहे. ही जगदंबा अन्नपूर्णा नव्हे, असे म्हणत साक्षात जगन्माता अन्नपूर्णेची निंदा करीत फिरु लागली. पार्वतीला ही निंदा असह्य झाली. तिने दुर्वेचा गर्व उतरला. तिने पुन्हा तपश्चर्या केली. गणपतीची आराधना करु लागली आणि पार्वतीच्या शापापासून आपली मुक्ती करा अशी श्रीगणेशाजवळ प्रार्थना केली. श्रीगणेशांनी मग प्रसन्न होऊन तिला वर दिला. ‘अंशरुपाने तु पृथ्वीवर तृण होऊन राहशील. तृणरुप झालीस तरीही तेथे अमृतरुप धारण करून सर्वत्र पूज्य आणि मंगलदायिनी होशील. तुझ्या पत्राशिवाय माझी पुजा पूर्ण होणार नाही. तुझे पत्र मला आवडते असेल.’

तेव्हापासून दुर्वा गणपतीला आवडू लागल्या. गणपतीपूजनला दुर्वांना अग्रस्थान लाभलं.

या कथेतून आपल्याला मिळणारा संदेश मुलांनो तुम्ही लक्षात ठेवा; अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणून कधीही आपल्या गुणांबद्दल गर्व करु नका.

गणपतीला दुर्वा आवडतात (गणपतीच्या गोष्टी) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची