Loading ...

गणपती भालचंद्र झाला (गणपतीच्या गोष्टी)

गणपती भालचंद्र झाला (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला ‘भालचंद्र’ हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट.

गणपती भालचंद्र झाला - गणपतीच्या गोष्टी | Ganpati Bhalachandra Jhala - Ganpati Stories

आपल्या लाडक्या बाप्पाला ‘भालचंद्र’ हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट


गणपती भालचंद्र झाला (गणपतीच्या गोष्टी)

मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांना आपण अनेक नावांनी ओळखतो. त्यापैकीच एक नाव आहे ‘भालचंद्र’. पण हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच ही गोष्ट.



एकदा ब्रह्मदेव कैलासावर शंकराच्या दर्शनाला गेले असता नारदही तेथे आले होते. त्यांनी एक अपूर्व अमृतमय फळ शंकराला अर्पण केले. शंकराजवळच तेव्हा कार्तिकेय आणि गजानन हे दोघे बसले होते. ते दोघेही त्या फळासाठी भांडू लागले. तेव्हा हे फळ कोणाला द्यावे, असा शंकराला प्रश्न पडला. ब्रह्मदेवाने ते फळ कार्तिकेयाला देण्याचे सुचवले. त्याप्रमाणे शंकराने ते फळ कार्तिकेयाला दिले. म्हणून गजानन ब्रह्मदेवावर रागावले.

पुढे एकदा शंकर व गजानन ब्रह्मदेवाच्या भेटीसाठी सत्यलोकी गेले असता शंकराचे लक्ष नाही असे पाहून गजानन उग्र स्वरुप धारण करुन ब्रह्मदेवास घाबरवू लागले. गजाननाचे ते अदभुत, उग्र आणि विद्रूप रूप पाहून शंकराच्या भालप्रदेशी असलेल्या चंद्रास मौज वाटली आणि तो गजाननाच्या उग्र रुपाची कुचेष्टा करून मोठ्याने हसू लागला. त्यामुळे गजाननास राग आला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला, ‘तू माझ्या स्वरूपाची निंदा करून हसलास म्हणून त्रैलोक्यातील कोणीही जीव तुझे दर्शन घेणार नाहीत! जे घेतील त्यांना महापातक लागेल!’

गजाननाच्या शापामुळे चंद्राचे पूर्वीचे सौंदर्य लोप पावले आणि त्यास मलीन आणि दोन स्वरूप प्राप्त झाले. हे पाहून चंद्राला स्वतःचीच लाज वाटू लागली आणि तो लपून बसला.

हे वर्तमान जेव्हा साऱ्या देवांना समजले तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. त्या सर्वांनी मिळून गजाननाची प्रार्थना केली आणि चंद्राला त्याचे पूर्वीचेच रूप मिळावे अशी श्रीगणेशाची करुणा भाकली. इंद्राने चंद्राला बोलावून आणले आणि गजाननाच्या एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले. त्याप्रमाणे चंद्राने एकाग्र अंतःकरणाने एकाक्षर मंत्राचा बारा वर्षे तप केला.

चंद्राला झालेला पश्चात्ताप पाहून श्रीगणेशांनी प्रसन्न होऊन उःशाप दिला. तुझे पूर्वीचे सुंदर रूप तुला प्राप्त होईल. प्रत्येक महिन्याच्या कृष्णचतुर्थीला तुझे दर्शन घेतल्याखेरीज माझी पूजा पूर्ण होणार नाही. तुझे दर्शन घेतल्यावरच माझे भक्त जेवतील व उपवास सोडतील. तसेच तुझी एक कला मी भूषण म्हणून माझ्या मस्तकी धारण करीन. परंतु भाद्रपद चतुर्थीस जे कोणी तुझे दर्शन घेतील त्यांच्यावर चोरीचा आळ येईल.’ असा वर मिळाल्याबरोबर चंद्राचा मलीनपणा नष्ट होऊन तो पूर्ववत तेजस्वी झाला.

तेव्हापासून गणपतीच्या मस्तकावर चंद्राची कला शोभून दिसते आणि म्हणूनच गणपतीला भालचंद्र असेही म्हटले जाते.

तसेच प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणेशभक्त दिवसभर उपवास करून रात्री चंद्र दर्शन झाल्याशिवाय जेवत नाहीत व उपवास सोडत नाहीत. पण भाद्रपदातल्या गणेश चतुर्थीला रात्री चंद्राकडे कोणी पाहात नाही. जो चंद्राला यादिवशी पाहतो त्याच्यावर संकटे येतात व चोरीचा आळही येतो असे लोक मानतात.

गणपती भालचंद्र झाला (गणपतीच्या गोष्टी) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची