Loading ...
/* Dont copy */ body{user-select:none;-moz-user-select:none;-ms-user-select:none;-khtml-user-select:none;-webkit-user-select:none;-webkit-touch-callout:none} pre, code, kbd, .cmC i[rel=pre]{user-select:text;-moz-user-select:text;-ms-user-select:text;-khtml-user-select:text;-webkit-user-select:text;-webkit-touch-callout:text}

स्त्रिया आणि कंबरदुखी (आरोग्य)

स्त्रिया आणि कंबरदुखी (आरोग्य) - स्त्रीयांमध्ये कंबरदुखी जास्त प्रमाणात आढळते त्यासाठी त्याची काळजी आणि उपाय याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.

स्त्रिया आणि कंबरदुखी (आरोग्य)

कंबरदुखीचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळतं


स्त्रिया आणि कंबरदुखी (आरोग्य) - स्त्रियांच्यात असणारी कंबरदुखी ही स्त्रीरोगाशी संबंधित असते असं वाटणं स्वाभाविक आहे. कारण कंबरदुखीचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळतं.

Article for back pain in Women.“कामानं अगदी मेले गं! कंबरडे अगदी मोडून गेलेय!” अशा आशयाचे उद्गार लग्न, मुंजी, समारंभ, सण इत्यादी कार्यक्रमानंतर घराघरातून नेहमी ऐकू येतात. पण बरंच काम न पडताही कंबरदुखीनं त्रासून गेलेल्या स्त्रिया घरोघरी आढळतात, विशेषकरून पाळीच्यावेळी, गर्भारपणात किंवा बाळंतपणानंतर कंबर दुखणे म्हणून औषधपाणी घेणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण बरंच आहे.

अर्थात डॉक्टरकडून तपासणी करून औषधपाणी करणे हे प्रत्येक स्त्रीच्या कंबर दुखण्याच्या तीव्रतेवर, सहनशक्तीवर व इतर सोईवर अवलंबून असतं. आयुष्यात कधीच कंबर दुखली नाही अशी स्त्री शोधून मिळणं खरंच कठीण आहे.

कंबरदुखी व स्त्रीरोग


स्त्रियांच्यात असणारी कंबरदुखी ही स्त्रीरोगाशी संबंधित असते असं वाटणं स्वाभाविक आहे. कारण

 • कंबरदुखीचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळतं.
 • कंबरदुखी पाळीच्या आधी व पाळीत जास्त असते.
 • हे दुखणे सहसा गर्भारपणापासून किंवा बाळंतपणापासून सुरू होते.

स्त्रियांतील कंबरदुखीची कारणे


 • लक्षण म्हणून
 • स्त्रीरोग
 • अस्थीरोग
 • इतर कारणे

लक्षण म्हणून कंबरदुखी


गर्भाशयाच्या आकुंचनाने पाळीच्या वेळी अ‍ॅबॉर्शन किंवा बाळंतपणात कंबर दुखू लागते. यावेली गर्भाशयाची आकुंचने वाढलेली असतात. यामध्ये पोटदुखीबरोबर कंबरदुखीचा त्रास सुरू होतो.

गर्भारपण व बाळंतपणातील कंबरदुखी


गर्भारपणामध्ये पोटाचा भाग खूपच पुढे आलेला असतो. त्या पोटाच्या मणक्यांच्या स्नायूवर ताण बसतो (Lordosis). तसेच गर्भारपणात निर्माण होणारे अंतःस्त्रावामुळे लिगेंमेंट्समध्ये असणारा ताण कमी होतो.

बाळंतपणात कंबरेची हाडे व माकडहाड यात बरच सैलपणा आलेला असतो. बाळंतपणानंतर पूर्वीची स्थिती होण्यासाठी काही काळ जावा लागतो. परंतु यामुळे गर्भारपण व बाळंतपण यामध्ये कंबरदुखीचे प्रमाण जास्त आढळते.

स्त्रीरोग


या रोगामुळे निर्माण होणारी कंबरदुखी ही कंबर व कंबरेच्या खालच्या बाजूस मधोमध असते.

गर्भाशय योनीतून बाहेर येणे
यालाच अंग बाहेर येणे असे म्हणतात. गर्भाशय नेहमीच्या जागेवर ठेवणाऱ्या पेशीवर (लिंगेमेंट्सवर) ताण पडतो व त्यातून कंबरदुखी सुरू होते. परंतु ही कंबरदुखी विश्रांती घेतल्यानंतर किंवा झोपल्यावर कमी होते.

गर्भाशयाची पिशवी पालथी असणे
यानेसुद्धा हे दुखणे सुरू होते. परंतु प्रत्येक पालथी पिशवी असलेल्या स्त्रीस कंबरदुखी असेलच असे नाही.

पिशवीच्या तोंडास सूज येणे
सामान्यपणे हे दुखणं बाळंतपणानंतर किंवा एबॉर्शननंतर सुरू होते. ही सूज गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडापुरती मर्यादीत न राहता कडेच्या पेशीपर्यंत पोहचली तरी हे दुखणे जास्त वाढते.

गर्भाशयाच्या कडेच्या पेशींना सूज येणे
गर्भाशयाकडे रक्ताचा पुरवठा वाढणे किंवा जंतूंचा प्रादुर्भाव होणे यानेही कंबरदुखी सुरू होते. ही कंबरदुखी पाळीच्या आधी वाढते.

एन्डोमेट्रीओसिस
गर्भाशयाच्या आत दर महिन्याला वाढणारे आवरण इतर ठिकाणी वाढून संवेदनक्षम मज्जातंतूवर दाब आणते. त्यामुळे दर महिन्याच्या पाळीच्या आधी व पाळीत कंबरदुखी खूपच वाढते.

पोटात वाढणारा ट्यूमर
पोटात मोठा ट्यूमर असेल तर पाठीच्या कण्याला आधार देणाऱ्या स्नायूंवर ताण पडतो व त्यातून सारखी कंबरदुखी सुरू होते.

कॅन्सर
हा रोग गर्भाशयाच्या पिशवीच्या कडेला पसरलेला असेल किंवा संवेदनाक्षम मज्जातंतू कॅन्सरमुळे वेढले गेले असतील तर असह्य कंबरदुखी होते.

अस्थीरोग


 • मणक्याचे स्नायू व लिगेंमेट्स यामध्ये असणारी शिथीलता.
 • दोन मणक्यामध्ये असणारी कुर्चा सरकून कंबरदुखी सुरू होऊ शकते.
 • मणक्याचे रोग: संधिवात, टी.बी. कॅन्सरचा प्रादुर्भाव इत्यादी रोगांचे लक्षणं म्हणून कंबरदुखी सुरू होते.

इतर कारणे


 • मूत्रवाहिनी व किडनी यांच्या रोगांनी कंबरदुखी सुरू होते, परंतु त्याचे स्थान व लक्षणे बरीच वेगळी असतात. म्हणून त्याचे रोग ओळखणे सोपे जाते.
 • मानसिक ताण: काही वेळा कोणतेच कारण आढळून येत नाही. कंबरदुखीचे कारण मानसिक दुर्बलता किंवा विषण्णता असू शकते.

कंबरदुखी निर्माण होऊ नये म्हणून काय करावे?


कामात बदल व दोन कामात विश्रांती
कामाचा ताण पाठीच्या स्नायूंना, लिगेंमेंट्स व मणके यांना त्रास होईल असे वाकून काम करणे या प्रमुख गोष्टी कंबरदुखीस कारणीभूत असतात. कारणे टाळणेसाठी कामाच्या स्वरूपात बदल करावा. स्वयंपाक, पान मांडणे, वाढणे, केरवारे, धुणे ही कामे वाकून न करता बसून करावीत. यामुळे पाठीवर पडणारा ताण खूपच कमी होईल.

तसेच सर्व कामे दिवसाच्या तासामध्ये वाटून घेतल्यास एकाच वेळी एकदम पडणारा ताण एकाचवेळी न पडता संबंध दिवसात विभागून जाईल. तसेच दोन कामांच्यामध्ये थोडी विश्रांती घेतल्यास सर्वच अवयवांना विश्रांती मिळते व झालेली झीज भरून काढणेसाठी अवसर मिळतो. म्हनून योग्य तऱ्हेने कामात बदल कामाची सबंध दिवसात वाटणी व योग्य विश्रांती ही त्रिकुटी कंबरदुखी न होण्यासाठी उपयोगी पडते.

आहार
योग्य नत्रयुक्तपदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे आहारात असणे आवश्यक आहे. यामुळे शरीराची होणारी झीज योग्यवेळी भरून निघून परत कामाचा ताण सहन करण्यासाठी शरीर तयार राहील (योगासनातील चक्रासन नियमितपणे केल्यास कंबरदुखीच्या जुन्या तक्रारी निश्चितपणे दूर होतात).

व्यायाम
शरीरातील स्नायूंना व्यायामांची पुष्टी मिळते व त्यातील ताकद वाढते. त्यामुळे सांध्यांच्या हालचाली नीट होतात. त्याचबरोबर जादा वाढणारी चरबी कमी होणे महत्त्वाचे असते. वजन जास्त असेल तर वयाबरोबर जीर्ण होणाऱ्या सांध्यांना हे वजन पेलवत नाही व सांधेदुखी, गुढघेदुखी, कंबरदुखी हे विकार सुरू होतात. अर्थात घेतला जाणारा व्यायाम नियमीत असावा. चक्रासनानी विशेषकरून कंबरदुखी नाहीशी होते.

पाळीच्या वेळी, गर्भारपणात व बाळंतपणात कंबर दुखणे इ. बहुतेक स्त्रियांच्यात आढळते. पाळीच्या वेळी, तसेच बाळंतपणातील कंबरदुखी ही गर्भाशयाच्या आकुंचनामुळे असते. तसेच गर्भारपणात पोटातील वाढणाऱ्या गर्भामुळे मणक्यावर ताण येतो. या अवस्थेतील कंबरदुखीसाठी खास उपाय नाहीत. योग्य आहार, विहार, विश्रांती घेतली म्हणजे कंबरदुखी कमी होते.

इतर वेळेस सातत्याने कंबरदूखी असेल तर वरील दिलेली कारणे हुडकणे जरूरीचे असते. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा म्हणजे एखादा प्राणघातक रोग दुर्लक्षित होत नाही. म्हातारपणी कंबरदुखी असेल तर म्हातारपणामूळेच ही व्याधी आहे अशी समजूत करून घरी बसू नये. या उलट डॉक्टरांनी तपासणी केल्यास कॅन्सरसारख्या रोगांचे लवकर निदान होऊन उपाय योजनाही करता येते.

कंबरदुखी सुरू झाल्यावर उपाय करण्यापेक्षा कंबरदुखी सुरूच होऊ नये म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. मोठा कोणताही रोग नसल्याची खात्री करून घेतल्यावर असणाऱ्या कंबरदुखीवर योग्य उपचार करावेत. तसेच एखाद्या रोगामुळे जर कंबरदुखी असेल तर त्यावर योग्यवेळी उपचार करावेत, म्हणजे स्त्रियांच्या कंबरदुखीबरोबरच घरातील पुरुषांची डोकेदुखी थांबेल!

- डॉ. दिलीप धैसास

नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,14,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1066,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,31,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,1,अर्थनीति,3,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,827,आईच्या कविता,21,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,4,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,17,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आदित्य कदम,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,23,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,3,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,46,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,12,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,60,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,40,कवी बी,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुसुमाग्रज,7,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवकुमार,1,केशवसुत,2,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,12,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,8,गोड पदार्थ,58,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,424,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,1,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,6,तिच्या कविता,52,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,70,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,51,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,10,निवडक,2,निसर्ग कविता,23,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,2,पालकत्व,7,पावसाच्या कविता,31,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,12,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,13,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,15,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,88,प्रेरणादायी कविता,15,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,2,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,8,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,2,बायकोच्या कविता,4,बालकविता,14,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,14,भरत माळी,1,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,100,मराठी कविता,707,मराठी गझल,19,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,14,मराठी टिव्ही,41,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी मालिका,14,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,36,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,49,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,181,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,3,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,3,माझा बालमित्र,87,मातीतले कोहिनूर,16,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,9,मुंबई उपनगर,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,21,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,7,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,55,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,48,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,23,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,3,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,28,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संपादक मंडळ,1,संपादकीय,9,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,131,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,20,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,7,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सीमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,4,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,1,सैनिकांच्या कविता,3,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,318,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: स्त्रिया आणि कंबरदुखी (आरोग्य)
स्त्रिया आणि कंबरदुखी (आरोग्य)
स्त्रिया आणि कंबरदुखी (आरोग्य) - स्त्रीयांमध्ये कंबरदुखी जास्त प्रमाणात आढळते त्यासाठी त्याची काळजी आणि उपाय याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxfZ0seZiwJU1InPUL_OQVLDwrQR_RJ-_hgaihJz3BXFLqzDIYUg_sNzuqWAV146unHU6TgZHRtLeCOqAi_S32YwHeMUlZzQVoYyV_5aqRJKwE_ujX2N2Ln7xzsIaGbNuw2ATqtusS6HozOzR_gnOpINJwphtZ6nagIxExutoQg-O73NsxxsA3ItMtow/s1600-rw/striya-ani-kambardukhi.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxfZ0seZiwJU1InPUL_OQVLDwrQR_RJ-_hgaihJz3BXFLqzDIYUg_sNzuqWAV146unHU6TgZHRtLeCOqAi_S32YwHeMUlZzQVoYyV_5aqRJKwE_ujX2N2Ln7xzsIaGbNuw2ATqtusS6HozOzR_gnOpINJwphtZ6nagIxExutoQg-O73NsxxsA3ItMtow/s72-c-rw/striya-ani-kambardukhi.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2022/07/striya-ani-kambardukhi.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2022/07/striya-ani-kambardukhi.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची