कुणी म्हणाले - मराठी कविता

कुणी म्हणाले, मराठी कविता - [Kuni Mhanale, Marathi Kavita] रडता रडता हसले, मी हसता हसता रडले, भावनांच्या खेळां मध्ये, गडगडले गडबडले.
कुणी म्हणाले - मराठी कविता | Kuni Mhanale - Marathi Kavita

रडता रडता हसले, मी हसता हसता रडले, भावनांच्या खेळां मध्ये, गडगडले गडबडले

रडता रडता हसले
मी हसता हसता रडले
भावनांच्या खेळां मध्ये
गडगडले गडबडले

कुणी म्हणाले वेडी कुठली
कुणी म्हणाले खुळी
कुणी म्हणाले या जगतातील
हीच लुळी पांगळी

आनंदात मी हसले तर मग
जग ही मज सव हसते
स्वानंदाच्या लहरी पाहून
का कुणी मन ठुसठुसते

मना वेदना झाल्या जर तर
अश्रू का न गळावे
जिवंत आहे जर मी तर मग
जिवंत का न दिसावे

रडू नका आणि हसू नका
हा नियम मुर्ख जगाचा
म्हणुनच वाटे मला सदाचा
हा जग मेलेल्यांचा

मरु नका हो जगुन घ्या हो
वेळ राहिली थोडी
रडण्या हसण्या मधेच आहे
आयुष्याची गोडी

या दुनियेच्या रणांगणावर
यशवंत व्हा बळवंत व्हा
काही व्हा पण त्या आधी
पहिले थोडे जिवंत व्हा

- समर्पण


कुणी म्हणाले - मराठी कविता


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.