न सुटणारे कोडे - मराठी कविता

न सुटणारे कोडे - मराठी कविता - [Na Sutnare Kode, Marathi Kavita] गांधी महिमा सांगून नेते, संपत्तीचे भरती घडे, लोक प्रपंची पंचा नेसून.
न सुटणारे कोडे - मराठी कविता

गांधी महिमा सांगून नेते, संपत्तीचे भरती घडे, लोक प्रपंची पंचा नेसून, उत्पन्नाचे सोडवी कोडे

गांधी महिमा सांगून नेते
संपत्तीचे भरती घडे
लोक प्रपंची पंचा नेसून
उत्पन्नाचे सोडवी कोडे

टक्क्यांमधले लालचलेले
अधिकारी चांडाळ चौकडे
खात टोपणे दरिद्री जनता
फिरते घेऊन शरीर उघडे

शिक्षण निर्बुद्धांच्या हाती
प्रध्यापकीचे धिंडवडे
बेकारांची फौज जमवुनी
प्राध्यापक वाजवी चौघडे

यंत्राने घरख्यास मारुनी
टपली, म्हटले चला पुढे
यंत्र युगाचे असेच असते
न सुटणारे कोडे

- प्रफुल्ल चिकेरूर

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.