वीरांगना स्मृती - मराठी कविता

वीरांगना स्मृती, मराठी कविता - [Virangana Smruti, Marathi Kavita] वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांस समर्पित कविता.
वीरांगना स्मृती - मराठी कविता | Virangana Smruti - Marathi Kavita

वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांस समर्पित कविता

इतिहासाला नवा उजाड देणारी
जिचा इतिहास एक ‘स्त्री’,
क्रांतिकारी विचार स्त्री कर्तृत्वाने रचणारी
वीरांगना,
राणी लक्ष्मीबाई

ज्या मनूला चौथ्या वर्गात
मातृत्वापासून पोरकं व्हावं लागलं
तरीही न डगमगता सामोरे गेली
तिला छबिली म्हणून हाक मारीत तीच,
राणी लक्ष्मीबाई

इतिहासाअंगी स्त्रियांना सक्षम करणारी
शूरत्व दावणारी
इंग्रजांच्या फितुरीला फितुरी लावणारी
मोरोपंत तांबेंची लेक,
राणी लक्ष्मीबाई

निव्वळ चौदाव्या वर्षात विवाह झाला
त्यापरत्वे या स्त्री मनाने शूरतेचा हुंकार केला
स्त्रियांनाही शूरतेचे प्रात्यक्षिके देऊ लागली
ती झाशी ची सूनबाई
राणी लक्ष्मीबाई

पुत्र जन्मल्यास्तव एका कटापायी गेला
तरीही न डगमगता
दत्तक पुत्राची आस राखणारी
ब्रिटिशांच्या या विरोधाला न जुमानणारी
राणी लक्ष्मीबाई

अतुल्य साहसादी
असे ब्रिटिश ऑफिसर ने जिला उद्गारले
ती सुंदर व चतूर मणिकर्णिका
त्यानेही सॅल्यूट करावे ती आपली
राणी लक्ष्मीबाई

तेविसाव्या वर्षी कटापायी मुल पुरले
मातेच्या अंकुराला गिळंकृत केले
पंचविसाव्या वर्षी विधवा झाली
पोरावाचून पोरकी झाली तरीही
खंबीर राही ही
राणी लक्ष्मीबाई

जिला मिळाली शाही शिक्षा
ज्यात घोडसवारी, निशाणेबाजी, तलवारबाजी इ.
जी इंग्रजांशी मुठभेड करण्यास सक्षम होती
असली ‘स्त्री’ सैनिक
राणी लक्ष्मीबाई

एकोणतीसाव्या वर्षी देहत्याग करणारी
वीरगती प्राप्त झालेली
झाशीची कर्तृत्ववान स्त्री
राणमर्द मराठा रणचंडी
राणी लक्ष्मीबाई

यत्र नार्यस्तू पूज्यते
तत्र देवतो रमन्ते
असल्या महान स्त्री विभूतीस
सर्व जनसमूदाय करूया
“नमन!”

- शूभम बंबाळ

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.