Loading ...

उमलण्याआधी - मराठी लेख

उमलण्याआधी, मराठी लेख - [Umalanya Aadhi, Marathi Article] आई मी तुझ्या आणि बाबांच्या रक्ताचा अशं आहे; तुमच्या प्रेमाचं प्रतिक आहे.

एका कळीची उमलण्या आधीची अवस्था

आई मी तुझ्या आणि बाबांच्या रक्ताचा अशं आहे; तुमच्या प्रेमाचं प्रतिक आहे. तर मग मी मुलगी किंवा मुलगा काय फरक पडतो? आज पासून नऊ महिने मी तुझ्या उदरात वावरणार, तुझ्या प्रत्येक श्वासासोबत माझा ही श्वास जोडला जाणार, माझ्या संगोपणासाठी तू आणि बाबा आजपासूनच सुरूवात करतात कारण तू सुखरूप तर मी ही सुखरूप म्हणुन बाबा तूझी काळजी करतात पण त्या काळजीमध्ये तुलाच फक्त माझ्या हालचालीची चाहूल लागते माझ्या बरोबर तुझं नातं नऊ महिन्यांच्या पहिल्या दिवसापासूनच असत नाही तर बाबा आणि दुसऱ्या सगळ्या नात्याची ओळख माझ्या जन्मानंतर होते आणि माझ्या जन्मानंतरच जोडली पण जातात. आता डॉक्टर्स मुलगी कि मुलगा हे सांगत नाहीत त्यासाठी पूर्ण नऊ महिने वाट बघावी लागते. पण यामध्ये मला तुझ्या उदरात राहून तुझ्या मायेच्या उबेची सवय होऊन जाते.

जस जसे दिवस सरतात तस तसे आपल्या दोघांमधले प्रेम वाढत जाते. माझ्यात होणाऱ्या शरीरातल्या बदलांना बघून तू सुखावते आणि मी तुझ्या उदरात सुखरूप आहे या भावनेने सुखावते. माझ्या छोट्या-छोट्या हात पायाची वळवळ तुझ्या चेहऱ्यावर नकळत हसू देऊन जाते जर ती वळवळ तुला जाणवली नाही तर तू सैरावैरा होतेस. तुझ्या डोळ्यातून आलेला एक ना एक अश्रू मला ही अस्वस्थ करून देतो. आता काहीच दिवस राहिले मी तुझ्या उदरातून तुझ्या हातामध्ये असणार कायम तुझ्या सोबत तुझी सावली म्हणून वावरणार.

[next] आज तो दिवस आला आणि मी माझ्या आईला आज भेटणार तिच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक क्षणांना मला माझ्या डोळ्यात नजर कैद करायचे आहे. भेटले मी आज माझ्या आईला तिने मला अलगद हातात घेतले आणि अगदी तसेच झालं, ती मला बघून सुखावली आणि ढळढळी रडू लागली तिचे ते आनंद अश्रू मला खुप काही सांगून गेले की माझ्या आल्याने तिच्या मातृत्वाची परिभाषा पूर्ण झाली पण माझा जन्म एक मुलगी म्हणून झाला हे कदाचित माझ्या बाबांना मान्य नसावं म्हणून त्यांनी हातात घेणं तर दूरच पण एकदा माझ्याकडे पाहिले देखिल नाही तरी माझी आई माझी तशीच काळजी घेत राहिली काही दिवसांनी आम्ही आमच्या घरी आलो पण बाबांनी मला जवळ केले नाही. आईने खुप समजावले बाबांना पण त्यांना माझं असणं खुपच खटकत होतं. पण का कोणास ठाऊक आज मला बाबांनी त्यांच्या हातात घेतले आनि आम्ही दोघीही आनंदाने भारावून गेलो पण बाबांच्या मनात काही वेगळचं असावं बाबा आईला सांगून मला बाहेर घेऊन आले आणि जवळच असलेल्या एका रस्त्याच्या किनारी मला सोडून गेले त्यांना तिथे कोणी बघीतले नाही पण काही वेळाने आईला सांगीतले विसरून जा की आपल्याला मुल झालेच नाही आईच्या पायाखालची जमीन नाहीशी झाली त्या अवस्थेत आई सैरावैरा भटकू लागली पण माझ्या पर्यंत पोहोचू शकली नाही या सगळ्या प्रकारामध्ये मी आणि आई आमचा शेवटचा श्वास मोजत होतो आणि दोघीही एकाच क्षणी या जगातून जात आहोत याचाच आनंद जास्त होता या जगात नाही तर आम्ही आमच्या जगात तरी एकत्र असू.

[next] मला बाबांना एकच प्रश्न करायचा आहे की बाबा आईने जसे माझ्याशी पहिल्या दिवसापासून नाते जोडले होते तसे तुम्ही का नाही जोडू शकला मीपण तर तुमचाच अशं होते ना बाबा मुलगी किंवा मुलगा हे आईच्या हातात नाही हे तुम्हालाही माहित असताना मग तुम्ही असे का वागलात आजही अशा प्रवृत्तीची लोक आहेत याचा विचार ही करवत नाही आणि तुमच्या अश्या वागण्याला मी काही बोलू शकत नाही ठीकच आहे तुम्ही आईला माझ्यापासून दूर करू शकला नाहीत याचेच उपकार मानून मी तुमची चिमुकली तुमची रजा घेते.

वरिल छोट्याश्या लेखातून मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत पण आवर्जून सांगावसं वाटतं की या सगळ्या प्रकारांना कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे. आम्हीही तिघी बहीनी आहोत आणि मी खूप भाग्यवान समजते स्वतःला माझ्या आई बाबांनी कधीच आम्हां भावंडामध्ये कसल्याच प्रकारचा फरक केला नाही तर आपण फक्त बोलण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे बोलणं खूप सोपं आहे मुलीचा जन्म, मुली वाचवा, मुलगी शिकली प्रगती झाली पण तरी ही अशा घटना घडतच आहेत. तर थोडा विचार करा आणि झालंच तर जरा समजून घ्या.
विद्या कुडवे | Vidya Kudave
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता, मराठी लेख या आणि अशा विविध विभागांत लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची