पुस्तकांच्या गप्पा - मराठी कविता

पुस्तकांच्या गप्पा, मराठी कविता - [Pustakanchya Gappa, Marathi Kavita] घुसमटलेल्या काळ्याकुट्ट ढगांनी एकमेकांवर आदळत सभोवतालास लख्ख प्रकाश द्यावा.

पाऊस पडण्यापूर्वी पुस्तकांच्या चोरून ऐकलेल्या गप्पा

घुसमटलेल्या काळ्याकुट्ट ढगांनी
एकमेकांवर आदळत सभोवतालास लक्ख प्रकाश द्यावा
आणि अनंताची कृष्ण विवरे गिळून घ्यावी क्षणार्धात!

जसे...
सत्य - असत्यावर आदळू लागतात
आणि असंख्य दांभिक संवेदनांनी पांघरलेल्या
रक्तामांसाच्या महाकाय यंत्रणा
कागदासारख्या फडफडू लागतात,
भिजू लागतात
आणि मातीत विरून जातात क्षणार्धात.

पाऊस पडण्यापुर्वी
वेड्यापिस्या झालेल्या वाऱ्याशी
अंगणात उघड्यावर पडलेल्या
अनेक पुस्तकांच्या गप्पा;
मी चोरून ऐकायचो कधी काळी काळोखात.
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.