तुझ्याशी बोलल्याशिवाय, चैन काही पडत नाही, कितीही बोललो तरी, बोलणे काही संपत नाही
तुझ्याशी बोलल्याशिवायचैन काही पडत नाही
कितीही बोललो तरी
बोलणे काही संपत नाही
बोलून झाल्यावर वाटतं
अजून थोडे बोलायचे होते
मनातील खूप काही
आज तुला सांगायचे होते
तुझ्याशी कितीही बोललो तरी
मन कधी भरत नाही
तुझ्या आठवणींची उजळणी करायला
रात्रही पुरत नाही
पुन्हा सकाळ होते आणि
सुरू होतो तोच नव्याने खेळ
मनातले बोलायचे की नाही
या द्वंद्वात निघून जातो वेळ
पुन्हा फक्त अवांतर
बोलणे तेवढेच होते
मनातले सगळे मग
मनातच राहून जाते