शब्दांती मी सावळा, मराठी कविता - [Shabdanti Me Savala, Marathi Kavita] हातातून अलगद निसटणारे क्षण किंमत त्यांची लक्षो मण, मातीच्या मणात मोजलेलं आयुष्य कडू - गोड घटनांचं रण.
हातातून अलगद निसटणारे क्षण किंमत त्यांची लक्षो मण
मातीच्या मणात मोजलेलं आयुष्य कडू - गोड घटनांचं रण
त्यात रणशिंग माझ्याच निर्णयांची, कपाळावर आठ्यांचं धनुष्य
कुठला बाण कुठे लागतोय हेच बघण्यात आटतंय आयुष्य
सकाळी उठून सूर्याला नमस्कार नंतर देवघरातल्या पंचधातूला
“शक्ती, बुद्धी, यश दे, सुखी ठेव सर्वांना आणि मला”
चैत्र ते फाल्गुन तोच देव, विनवण्यांची फक्त चढ - उतार
सोयीनुसार बदलणारे नियम, सोयीनुसार नियमांच्या पार
सोमवार ते रविवार तीच तीच माणसं, झोळीत त्यांच्या नऊ मुखवटे
कधी जवळचे कधी धटिंगण, डोक्यावर मतलबांचे फेटे
माणसांत असून माणसांत नसून गरज भावनांना आधाराची
कधी विसंगत कधी सुसंगत, त्यांनीच त्यांच्यात एक होण्याची
बहु जरी मी शिखर जिंकलो, शोधणार तिथे मनातलं धन
होकाराच्या तळ्यात नकाराच्या मळ्यात, वणव्यात पेटलेलं आठवणींचं वन
आईच्या कुशीचा आजीच्या गोष्टींचा, आठवणींना आपला तोच जुना वास
आठवणींत आठवणी आठवणाऱ्यांच्या, श्वासांच्या साखळीत एक शिळा श्वास
वाकवलेले आदर्श फाकवलेलं कुंपण, सैरभैर पळालेली आपुलकीची गुरं
सैरभैर मी सैरभैर तू, सैरभैर सर्वांच्या पराकाष्ठेची दारं
जीवाला उसंत माझ्याही नाही, तुझ्याची मनात शंकेच्या पाली
अलबत शंका गलबत शंका, शंकेच्या हुडहुडीवर संशयाच्या शाली
आनंदाच्या तेराव्याला वैराग्याच्या पंगती, जेवणात पौष्टिक विचारांचे लाडू
बहुदा तुझा कधी अजून कुणाचा, ढेकर दिल्यावर हसू की रडू?
सगळंच काही क्षणांपुरतं, माझं तुझं प्रेम तुझा माझा जिव्हाळा
माझ्यावर फुलणाऱ्या माझ्याच कवितेत, अभ्यंग शब्दांती मी सावळा
कधीतरी मी हरवून जाईन, त्याच हरवलेल्या विचारांच्या वाटेवर
माझ्याच शब्दांचं बोट धरून तुझ्या वर्णनाच्या शब्दांवर स्थावर
तू रेखाटलेल्या माझ्या चित्रात कास शोधीन तुझ्या स्वप्नांची
आटत चाललेल्या आयुष्यात माझ्या पुन्हा गजबज मुक्त चित्रांची

अभिप्राय