संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील अभंग या गीत प्रकारातील संत तुकाराम यांची रचना
शीर्षक | आनंदाचे डोही आनंद तरंग |
---|---|
गीतकार | संत तुकाराम |
संगीतकार | श्रीनिवास खळे |
गायक | लता मंगेशकर |
गीत प्रकार | अभंग |
आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंद चि अंग आनंदाचे ॥धृ॥
काय सांगो जालें कांहीचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥१॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥२॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥