एकदा एका कोल्ह्याने, घेतली नवी बुलेट, सार्या जंगलात गर्वाने, वाटू लागला चॉकलेट
एकदा एका कोल्ह्यानेघेतली नवी बुलेट
सार्या जंगलात गर्वाने
वाटू लागला चॉकलेट
कोल्हा लागला फोनवर बोलू
त्याची बुलेट गाडी होती चालू
कोल्ह्याला चढला जोश
एका आंब्याच्या झाडाला मारली त्याने ठोस
हे पाहून ट्रॅफिक पोलिस पोपटराव
कोल्ह्यावर खूप जोरात भडकले
गाडीवरून त्याला उतरवले
झाडाच्या भरपाईचे बील फाडले
मग म्हणू लागला कोल्हा रडून
चूक झाली माझ्या हातून
हेल्मेट घालणार, फोनवर नाही बोलणार
वाहन चालवतानाचे सर्व नियम पाळणार
पोपटरावांना आली मजा
कोल्हेबुवांना झाली सजा