प्रेम विवाह - मराठी कविता

प्रेम विवाह, मराठी कविता - [Prem Vivah, Marathi Kavita] प्रेम हे असे वेडे तुझ्या प्रेमाचे, मी सगळं सोडून आले.
प्रेम विवाह - मराठी कविता | Prem Vivah - Marathi Kavita

प्रेम हे असे वेडे तुझ्या प्रेमाचे, मी सगळं सोडून आले

प्रेम हे असे वेडे तुझ्या प्रेमाचे
मी सगळं सोडून आले
तुझ्याच घरची होईल राणी
अशी शपथ घेऊन आली

लेक लाडकी माझ्या बापाची
मी तुझ्याच घरची झाली
हट्ट सोडून माहेरचा मी
हट्ट तुझे पुरवत आली

टिकली तुझी, चुडा तुझा
जोडवी तुझ्या नावाची मी घातली
झाली फिक्की मेहंदी आता
मी तुझ्या घरची झाली

राणी सारखी बनवून ठेवेन म्हणालास
बघ वेळ तीच आज कशी आली
किचन मधलं राज्य माझं
लाटणं पळपटाची राणी मी झाली

कर्तव्याच्या जाळ्यामध्ये
अडकवून अशी मी गेली
सासू-सासरे नाती
आई-बाप ही माझी झाली

सगळे करते तुझ्याचसाठी
आई-बाप ही सोबत नाही
तोडून आले बंधन नात्यांचं
आता उरले तुझ्यात सारं काही

राखीला ही माझ्या आता
हात समोर नाही
बहिणीची मैत्री आता
स्वप्नात फक्त साथ देई

चीड-चीड तुझी दिवस भराची
माझ्याच कपाळीच ठायी
वेळ नसतो तुला आता
म्हणे तुला समजत कसं नाही

उठल्या-उठल्या कामावर
जायची असते तुला घाई
दिवस रात्र हवी असते
तुला सोशल मीडियाची मलाई

काळ बदलला, विचार बदलले
आयुष्य हे सुनेचं आता चुली वरचं नाही
घेऊदे मला ही उंच भरारी
स्वयंपाकातच आयुष्य माझं
मला संपवायचं नाही

येईल रे बाळ जगात आपलं
त्याला नावही माझं नाही
खरचं सांग तुझ्या हृदयात
मला जागा उरणार का नाही?

कोंडली जाते रे तुझ्या प्रेमाच्या भिंतीत
तिला तोडता येत नाही
तुझ्यापासून दूर राहून
मला एकटं जगता येत नाही

एकच ईच्छा पूर्ण कर
मला वेल दे तुझा काही
तुटलेल्या या मनाला आता
जगण्याची ईच्छा नाही
जगण्याची ईच्छा नाही


सचिन पोटे | Sachin Pote
मुंबई, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी माध्यमातून शिक्षण झालेले, अस्सल मुंबईकर सचिन पोटे हे ‘द युथ सोशल फोरम’ या स्वयंसेवी संस्थेसोबत जोडलेले आहेत आणि मराठी भाषेवर नितांत प्रेमापोटी विविध विषयांवर लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.