वळणांचे रस्ते, की रस्त्यांची वळणे
वळणांचे रस्ते
की रस्त्यांची वळणे
वाट पुढे आहे कशी
इथे कोण जाणे
चार श्वासांचे जगणे
चार शब्दांचे गाणे
चार क्षणांचे सुख
चार काट्यांचे सलणे
आयुष्य असेच चार घटकांचे
आपण फक्त त्यावर प्रेम करत राहणे
मराठी कविता या विभागात लेखन.