तो प्रभातेपरि गौर सुकुमार, ती संध्येसारखी सावळी सुंदर
तो प्रभातेपरि गौर सुकुमारती संध्येसारखी सावळी सुंदर
तो पर्वतकड्याच्या कातळापरि अढळ
ती खळाळणाऱ्या नदीसारखी चंचल
तो माध्यान्हीच्या सूर्यासम तेजस्वी
ती पुनवेच्या चांदण्यापरि कोमल
तो मृदंगावरी तांडवरूपी ताल
ती वेणूच्या गोड सुरांची माळ
तो खंबीर मुळांचे जुने वडाचे झाड
ती वाऱ्यावरती स्वार सावरी फूल
तो कडाडणारा वळीव वादळी लोळ
ती उन्हामागची श्रावणातली सर