पुन्हा एकवार - मराठी कविता

पुन्हा एकवार, मराठी कविता - [Punha Ekwar, Marathi Kavita] पुन्हा एकदा वळण नवे, कळेना कोणती चालावी वाट, पुन्हा एकवार.

पुन्हा एकदा वळण नवे, कळेना कोणती चालावी वाट, पुन्हा एकवार

पुन्हा एकदा वळण नवे
कळेना कोणती चालावी वाट
पुन्हा एकवार

परत एकदा नवा प्रहार
मन - मेंदूचा वार - प्रतीवार
पुन्हा एकवार

पुन्हा एकदा त्रासले मन
अन्यायी जुलुमाने जाचले मन
पुन्हा एकवार

परत एकदा काळोखा अंधार
सापडेना शोधूनही उषःकाल
पुन्हा एकवार

पुन्हा एकदा झाले चक्र सुरु
लागे टीका वीज कडाडू
पुन्हा एकवार

परत एकदा दाटले कृष्णमेघ
झाली मजवर दुःख बरसात
पुन्हा एकवार

पुन्हा एकदा केली याचना
टाकला गहाण स्वाभिमान
पुन्हा एकवार

परत एकदा नटसम्राट
फिरले परत दारोदार
पुन्हा एकवार

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.