अमृत - मराठी कविता

अमृत, मराठी कविता - [Amrut, Marathi Kavita] सुकलेल्या धरणीला, ओलाव्याची फुंकर, हलकेच वितळते पहा, वियोगाचे डोंगर.

सुकलेल्या धरणीला, ओलाव्याची फुंकर, हलकेच वितळते पहा, वियोगाचे डोंगर

सुकलेल्या धरणीला
ओलाव्याची फुंकर
हलकेच वितळते पहा
वियोगाचे डोंगर

नजरेत मावेना
रिमझिमणारा आनंद
श्वासासही जाणवला
मोकळेपणाचा सुगंध

खेळते गीत मधुर
हास्याशी लपंडाव
वादळे पार करूनी झाला
मायेचा वर्षाव

हाताच्या रेषेवरी जसा
तुषार तो नाचतो
शीतल वारा कानात माझ्या
खुदकन हासतो

मोहरलेल्या ओंजळीतले
थेंब ओठाने मोजले
ताहानलेल्या पाखराला
मेघाने अमृत पाजले


ऋचा मुळे | Rucha Muley
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल मराठी कविता विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.