Loading ...
/* Dont copy */

पेब किल्ला

पेब किल्ला - [Peb Fort] २१०० फूट उंचीचा पेब किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत डोंगररांगेतील पेब किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

पेब किल्ला - Peb Fort

माथेरानसारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या माणसांच्या गर्दीपासून मोकळीक हवी असल्यास निसर्गप्रेमींनी पेबचा किल्ला विसरू नये

पेब किल्ला - [Peb Fort] २१०० फूट उंचीचा पेब किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत डोंगररांगेतील पेब किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. पनवेलच्या ईशान्येला मुंबई पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन-चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. माथेरानसारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या माणसांच्या गर्दीपासून मोकळीक हवी असल्यास निसर्गप्रेमींनी पेबचा किल्ला विसरू नये.

एरवीदेखील एका दिवसाच्या ट्रेकसाठी ‘पेब’ सारखी जवळची आणि निसर्गरम्य जागा शोधून सापडणार नाही. किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ चढण्याची वाट, वरील गुहेची रचना, गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड ‘गोरखगडाशी’ साधर्म्य साधतो. मात्र त्यामानाने हा किल्ला चढताना लागणारे जंगल घनदाट आहे. पेबच्या किल्लाचे बिकटगड असे देखील नाव आहे.

पेब किल्ल्याचा इतिहास


पेब किल्ल्याचे मूळ नाव हे पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पडले असावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्यावर आढळतो.

पेब किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


पेबचा किल्ला चढतांना वाटेत लागणारा धबधबा हे एक मोठे आकर्षण. किल्ल्यावरील गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहे समोरून आपल्याला नवरा-नवरी, भटोबा असे सुळके दिसतात. या गडावर कोणत्याही ऋतूत जाता येते.

पेब गडावर जाण्याच्या वाटा


मध्य रेल्वेने कर्जतमार्गे नेरळ स्टेशनवर उतरल्यावर स्टेशनपासून थोडे बाहेर आल्यावर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. पेबला जाण्यासाठी नेरळ स्टेशनला उतरावे आणि उजवीकडची वाट पकडावी. डावीकडची वाट आपणास माथेरानला घेऊन जाते. डोंगराच्या दिशेने जाताना मैदान, पोल्ट्रीफार्म, अर्धवट घरांची बांधकामे या काही खुणा सांगता येतील. त्यानंतर समोर दिसणाऱ्या इलेक्ट्रिकच्या मोठमोठ्या टॉवरच्या दिशेने मार्गक्रमण करावे. सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर आल्यावर तेथून थोडे पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. या धबधब्याजवळ आपल्याला ३ वाटा लागतात.
  • धबधब्याला लागून असलेली वाट.
  • मधून गेलेली मुख्य वाट.
  • टॉवर्सला लागून असलेली वाट.
या तीन वाटांपैकी मधली मुख्य वाट हीच किल्ल्याच्या गुहेपर्यंत नेणारी खरी वाट आहे. पहिल्या वाटेने पुढे गेल्यास जंगल लागते. पण पुढे या वाटेने जाणे अशक्यच आहे. तिसरी वाट म्हणजे मानेला वळसा घालून घास घेण्यासारखा प्रकार होय. तसेच या वाटेला पनवेलकडे जाणारे फाटे फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. मधून जाणारी वाट पकडावी. या वाटेने गणपतीचे चित्र काढलेला दगड येतो. या दगडाच्या उजव्या बाजूने वर चढावे. हीच वाट पुढे झऱ्यांची होत असली तरी ही वाट न सोडता याच वाटेने खिंडीच्या दिशेने वाटचाल करावी. खिंडीत पोहोचल्यावर तेथून डाव्या हाताला वळून पुढे जावे.

तेथून पुढे पांढरा दगड लागतो. पांढरा दगडा चढण्यास अतिशय कठीण असून तो पार केल्यानंतर मात्र पुढे थोड्याच अंतरावर गुहा लागते. प्रथमच जाणाऱ्यांनी वाटाड्या घेणे हितकारक आहे. किल्ला चढण्यास लागणारा वेळ दोन ते अडीच तास आहे. पेबवर जाण्यासाठी गिर्यारोहकांना आणखी एक वाट आहे. त्यासाठी माथेरानच्या पॅनोरमा पॉईंटवर यावे. येथून सुमारे ६ तासात पेबच्या गुहेत पोहचतो येते. गुहांच्या पायथ्याशी गरुड कोरला आहे.

पेब किल्ल्यावर गुहेमध्ये स्वामी समर्थांचे शिष्यगण रहात असल्याने गुहेच्या बाहेर किंवा जवळच असलेल्या कपारीमध्ये १० जणांच्या रहाण्याची सोय होते. गुहेजवळच असलेली पाण्याची टाके हीच पिण्याच्या पाण्याची सोय आहे. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. गडावर जाण्यासाठी ३ तास नेरळ पासून लागतात.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची