Loading ...

न्हावीगड किल्ला

न्हावीगड किल्ला - [Nhavigad Fort] ४१०० फूट उंचीचा न्हावीगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण डोंगररांगेतील न्हावीगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

न्हावीगड किल्ला - Nhavigad Fort

न्हावीगड किल्ल्याला रतनगड असे देखील म्हणतात

न्हावीगड किल्ला - [Nhavigad Fort] ४१०० फूट उंचीचा न्हावीगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण डोंगररांगेतील न्हावीगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. सह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते.

उत्तरेकडून सुरू होणाऱ्या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगी-तुंगी सुळके, न्हावीगड, असे गड आहेत तर दुसऱ्या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत.

न्हावीगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


न्हावीगड किल्ल्याला रतनगड असे देखील म्हणतात. गडावर जाण्याच्या वाटेवर पिण्याच्या पाण्याची टाकी आणि देवीचे एक मंदिर लागते. गडावर जातांना आपल्याला पायऱ्या तर लागतात पण दरवाज्याचा मात्र मागमूसही नाही. किल्ल्याचा माथा तसा निमुळताच आहे. गडावर पाण्याची तीन ते चार टाकी आहेत. घरांचे काही अवशेष सापडतात. गडाचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळकाच आहे. तो चढून जाण्यासाठी प्रस्तरारोहण आवश्यक आहे. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो. गडावरून मांगीतुंगी, मुल्हेर, मोरागड, साल्हेर आणि हरगड हा परिसर दिसतो.

न्हावीगड गडावर जाण्याच्या वाटा


वडाखेल मार्गे: न्हावीगडावर जाण्यासाठी ताहाराबाद मार्गे मांगीतुंगी गाव गाठावे. मांगीतुंगी गावातून १ तासाच्या चालीने वडाखेल गावात यावे. वडाखेलपर्यंत डांबरी रस्ता नाही. त्यामुळे पायीच त्रेधातिरपीट करावी लागते. वडालेखमधून पाताळवाडीकडे कूच करावे. पाताळवाडी हे पायथ्याचे गाव आहे. वडाखेल ते पाताळवाडी हे अंतर अर्ध्या तासाचे आहे. पाताळवाडीतून एक सरळ वाट किल्ल्याच्या पठारावर गेलेली आहे. या पठारावरून दोन वाटा फुटतात. एक वाट समोर नाकाडावरून वर चढते. ही वाट थोडी कठीण आहे.

वाटेने वर चढताना सोपं प्रस्तरारोहण करावे लागते. वाटेने वर चढल्यावर आपण पायऱ्यांशी पोहोचतो. दुसरी वाट पठारावरून डावीकडे वळसा घालून पायऱ्यापाशी जाते. या वाटेला पाण्याची दोन-तीन टाकी लागतात. गडावर जाणाऱ्या पायऱ्या मात्र जपूनच चढाव्या लागतात. पायऱ्यावर माती साचल्याने घसरण्याची शक्यता फार आहे. पाताळवाडीपासून गडावर दीड तासात पोहोचता येते.

गडावर राहण्याची सोय नाही. गडावर जेवणाची सोय नाही. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी पाताळवाडी गावातून दीड तास लागतो. गडावर जाण्यासाठी उत्तम कालावधी ऑक्टोंबर ते एप्रिल पर्यंत आहे.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची