मांगी-तुंगी किल्ला

मांगी-तुंगी किल्ला - [Mangi-Tungi Fort] ४००० फुट उंचीचा मांगी-तुंगी किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबारी डोंगररांगेतील मांगी-तुंगी किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
मांगी-तुंगी किल्ला - Mangi-Tungi Fort

मांगी-तुंगी किल्ला हे जैन लोकांची तीर्थक्षेत्रे

मांगी-तुंगी किल्ला - [Mangi-Tungi Fort] ४००० फुट उंचीचा मांगी-तुंगी किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबारी डोंगररांगेतील मांगी-तुंगी किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. बागलाण सुपीक सधन आणि संपन्न असा मुलुख सह्याद्रीच्या उत्तर-दक्षिणेची सुरुवात होते. ती या बागलखेड (बागलाण) विभागातूनच होते. येथे असणाऱ्या दुहेरी पूर्व-पश्चिम रांगेला सेलबारी-डोलबारी असे संबोधण्यात येते. ताहराबादला पोहोचले की मांगी-तुंगीचे दोन सुळके आपले लक्ष्य वेधून घेतात. मांगी-तुंगी ही जैन लोकांची तीर्थक्षेत्रे.

मांगी-तुंगी गडावर जाण्याच्या वाटा


मांगी-तुंगीला जायचे असल्यास नाशिक वरून सटाणामार्गे ताहराबाद गाठावे. गुजरात मधून यायचे झाल्यास नीलमोरा रेल्वेस्थानकावरून अहुआ मार्गे ताहराबाद गाठावे. ताहराबाद वरून भिलवाडी पर्यंत येण्यासाठी एस.टी. किंवा बससेवा उपलब्ध आहे. भिलवाडी हे मांगीतुंगीच्या पायथ्याचे गाव. भिलवाडीमध्येच जैनांची आदिनाथ, पार्श्वनाथ यांची मंदिरे आहेत. याला सुद्धा मांगी-तुंगीच म्हणतात. मांगी-तुंगी सुळक्यावर जाण्यासाठी गावातूनच रस्ता आहे. वीस मिनिटे रस्त्यावरून चालत गेल्यावर पुढे पायऱ्या लागतात. सुमारे २००० पायऱ्यांचा चढ चढून गेल्यावर आपण एका कमानीपाशी पोहोचतो. येथून डावीकडे गेलो तर मांगी आणि उजवीकडे गेलो की तुंगी.

गावात धर्मशाळा आहे. येथे १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. भिलवाडी गावात जेवणाची सोय होते. गावातूनच पाणी घेणे आवश्यक आहे कारण गडावर पाणी नाही. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून ३ तास लागतात.
मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.