Loading ...

महिपतगड किल्ला

महिपतगड किल्ला - [Mahipatgad Fort] ३०९० फूट उंचीचा महिपतगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना डोंगररांगेतील महिपतगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

महिपतगड किल्ला - Mahipatgad Fort

उत्तरेकडचा महिपतगड हा सर्वात उंच आणि विस्ताराने सुद्धा प्रचंड आहे

महिपतगड किल्ला - [Mahipatgad Fort] ३०९० फूट उंचीचा महिपतगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना डोंगररांगेतील महिपतगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. खेड तालुक्याच्या पूर्वेस १२ मैलांवर रसाळगड-सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. या मध्ये उत्तरेकडचा महिपतगड हा सर्वात उंच आणि विस्ताराने सुद्धा प्रचंड आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ १२० एकर आहे. हे तीन किल्ले एकमेकांच्या जवळजवळ असल्यामुळे अनेक ट्रेकर्स महिपतगड-सुमारगड-रसाळगड असा ट्रेक देखील करतात.

महिपतगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


महिपतगड हा नावाप्रमाणेच महिपत आहे. किल्ला तसा आकाराने फार मोठा आहे. चहुबाजूंचे कडे तुटलेले असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तटबंदीची गरज भासत नाही. काही ठिकाणी जिथे कडा चढण्यास सोपा आहे तिथे तटबंदी उभारली आहे. सध्या मात्र ही तटबंदी पडून गेलेली आहे. किल्ल्याला एकूण सहा दरवाजे आहेत. ईशान्येकडे लालदेवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा, आग्नेयेस यशवंत दरवाजा.

सद्य:स्थितीला हे दरवाजे नाममात्र उरलेले आहेत. हे सर्व दरवाजे होते याच्या खुणा फक्त उरलेल्या आहेत. शिवगंगा दरवाजा जवळ एक शिवाची पिंड आहे. पुसाटी दरवाजा जवळ एक शिडी आहे. कोतवाल दरवाजा जवळ, मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे. पारेश्वराचे एक मोठे मंदिर किल्ल्यावर आहे. या मंदिरात राहण्याची सोय होते. मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. या व्यतिरिक्त किल्ल्याचे पठार म्हणजे एक जंगलच आहे. अनेक प्रकारचे अवशेष या झाडीत लपलेले आहेत. या सर्वांचा अभ्यास होणे फार आवश्यक आहे. या किल्ल्यावर एक आगळावेगळा प्रकार दिसतो. तो म्हणजे न वापरलेल्या चुन्याचे अवशेष येथे पडलेले दिसतात. गड फिरण्यास दोन ते तीन तास पुरतात.

महिपतगड गडावर जाण्याच्या वाटा


खेड वरून पहाटेच दहिवली गावाला जाणारी बस पकडावी. खेड ते दहिवली १ तासाचे अंतर आहे. दहिवली गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. ही वाट लांबची असल्याने गडमाथा गाठण्यास ४ तास लागतात. या वाटेने जातांना आपल्याला दोन खिंडी पार कराव्या लागतात.

खेडवरून वाडीजैतापूरला जाणारी गाडी पकडावी. वाडी जैतापूरास उतरल्यावर मळलेल्या वाटेने वाडी बेलदार गावात यावे. वाडीजैतापूर ते वाडीबेलदार हे अंतर दोन ते अडिच तासांचे आहे. वाडिबेलदारहून गडमाथा गाठण्यास १ तास पुरतो. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा संभव नाही.
रसाळगडवरून सुमारगड मार्गेसुद्धा महिपतगड गाठता येतो. हे अंतर साधारणतः ७ तासांचे आहे. जंगल वाट असल्याने वाट चुकण्याचा फार संभव आहे.

पारेश्वर मंदिरात २० ते ३० जणांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. पाण्याची सोय बारामही उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी दहिवली गावातून ४ तास लागतात.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची