सांजवेळी पाखरांचे दूर जाणे, हा कोणता खेळ आहे
सांजवेळी पाखरांचे दूर जाणेहा कोणता खेळ आहे
सांजवेळी कंकणाचे चूर होणे
हा कोणता खेळ आहे
वाहती पाण्यावरून सदा
या साऱ्या मंद लहरी
सांजवेळी मासळ्यांचे सूर मारणे
हा कोणता खेळ आहे
काठ दोन्ही भरून गेले
बेताल झाली झाडेच अशी
सांजवेळी नदीला पूर जाणे
हा कोणता खेळ आहे
कोण आहे शिल्पकार हा
जीवनाचे चित्र रेखिले
सांजवेळी चुळीचे धूर जाणे
हा कोणता खेळ आहे
झाड गेले झाखाळूनि
दाटला अंधार दिशात
सांजवेळी डोंगरांचा नूर जाणे
हा कोणता खेळ आहे
निघाल्या कळपात गायी
शिस्त त्यांची वेगळी
सांगवेळी वासरांचे चौखूर होणे
हा कोणता खेळ आहे