Loading ...
/* Dont copy */

तू दिलेलं - मराठी कविता

तू दिलेलं, मराठी कविता - [Tu Dilela, Marathi Kavita] तू दिलेलं मागतोस, उपरेपणानं, तुझंच तुला देताना, आक्रसणारं माझं मन.

तू दिलेलं मागतोस, उपरेपणानं, तुझंच तुला देताना, आक्रसणारं माझं मन

तू दिलेलं मागतोस
उपरेपणानं
तुझंच तुला देताना
आक्रसणारं माझं मन
ठसठसणारी उरी जखम
तुझ्या देण्यात विरघळून गेलीय
काय देऊ तुझंच तुला...?
तुझं देणं होतं,
काठ पदर नसणारं वस्त्र
मी ते पांघरलं
सहनशीलतेचा काठ शिवून
संयमाचा पदर पांघरून
आता वस्त्र फाटलंय...
उरलेत काठ नि पदर
ज्यात अडकलेत तुझ्या देण्याचे
काही धागे...
जे वेगळे करताना,
पदर फाटेल, काठ उसवेल...
मला न संपवता
तुझं तुला काय देऊ
देताना तुझ्या हातानी
तू कोरलंस... विश्वासाचं काजळ
नेत्रांच्या कडा पुसता पुसता
काजळ उडून गेलं
नेत्रकडा जखमी झाल्या
सर्वस्व देण्याचं वचन देणारा तू अंधुक दिसू लागलास
तुझा मागणारा आवाज वाढतोय...
थोडा थांब...
तुझा आवाज मनापर्यंत पोचू देणार नाही
मी काठ पदर उराशी घेऊन जगेन
डोळे उघडे ठेवून


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची