चीज ऑम्लेट - पाककृती

चीज ऑम्लेट, पाककला - [Cheese Omelette, Recipe] चीज घालून बनवलेले चटपटीत ‘चीज ऑम्लेट’ ब्रेड किंवा बनमध्ये घालून खासकरून मुलांना न्याहारी किंवा मधल्या वेळेत देऊन खुश करू शकता.
चीज ऑम्लेट - पाककला | Cheese Omelette - Recipe

चीज घालून बनवलेले चटपटीत चीज ऑम्लेट

‘चीज ऑम्लेट’साठी लागणारा जिन्नस

 • २ अंडी
 • ३ मोठे चमचे दूध
 • अर्धा वाटी किसलेले चीज
 • चवीनुसार मीठ
 • १ हिरवी मिरची
 • १ लहान चमचा पांढरी मिरपूड
 • चिमूटभर मोहरीपूड
 • १ मोठा चमचा बटर

चीज ऑम्लेटची पाककृती

 • अंडी फोडून चांगली फेटून घ्या.
 • त्यात चवीनुसार मीठ, मोहरीपूड, हिरवी मिरची, दूध आणि मिरपूड घालून पुन्हा चांगले फेटून घ्या.
 • मंद आचेवर नॉनस्टिक पॅन ठेवून त्यावर बटर वितळवा.
 • फेटलेली अंडी पॅनवर एकसारखी पसरवून घ्या.
 • किसलेले चीज पसरवा.
 • ऑम्लेट एका बाजूने चांगले भाजल्यावर फोल्ड करा आणि गरमागरम सर्व्ह करा.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.