कुर्डुगड - विश्रामगड किल्ला

कुर्डुगड - विश्रामगड किल्ला - [Kurdugad Vishramgad Fort] २०२० फुट उंचीचा कुर्डुगड - विश्रामगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील रायगड डोंगररांगेतील कुर्डुगड - विश्रामगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
कुर्डुगड - विश्रामगड किल्ला - Kurdugad Vishramgad Fort

पुण्यापासून ९० कि.मी. अंतरावर असणारा कुर्डुगड - विश्रामगड किल्ला पाहण्यासाठी उत्तम कालावधी म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी.

कुर्डुगड - विश्रामगड किल्ला - [Kurdugad Vishramgad Fort] २०२० फुट उंचीचा कुर्डुगड - विश्रामगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील रायगड डोंगररांगेतील कुर्डुगड - विश्रामगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. पुण्यापासून ९० कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला पाहण्यासाठी उत्तम कालावधी म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी. ऑक्टोंबर मध्ये पावसाळा नुकताच ओसरलेला असतो. सगळीकडे हिरवेगार झालेले असते. अशा वातावरणात कोकणातील किल्ले पाहण्याची मजा काही औरच असते.

कुर्डुगड - विश्रामगड किल्ल्याचा इतिहास


राजमाची किल्ल्याच्या पोटात एक लेणं आहे. यालाच ‘कोडांणे लेणी’ असे म्हणतात. ही लेणी कोंडाणा गावापासून आग्नेयेस २ कि.मी. अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत. अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ट नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरुनच असे अनुमान निघते, की हा किल्ला साधारण २५०० वर्षांपूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी ‘कोकणाचा दरवाजा’ संबोधण्यात येत असे.

कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटवरील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतच्या सर्व प्रदेशावर शिवशाहीने वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला. सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. १७७६ मध्ये सदाशिवराव तोतयाने संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटापर्यंत पोहचला त्याने कुर्डुगड - विश्रामगड किल्ला घेतला. यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून कुर्डुगड - विश्रामगड किल्ला आणि बाजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला.

पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. उल्हास नदीच्या या पात्रात कोंदीवडे आणि कोंढाणा जवळ एका मोठ्या दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे. पूर्वी स्थानिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे. या परिसरात याला ‘जिजाऊ कुंड’ म्हणतात. या कुंडात लोक मोठ्या श्रद्धेने सूर्यस्नान करतात.

कुर्डुगड - विश्रामगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


किल्ल्याच्या पायथ्याशी कुर्डाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्यावर जातांना वाटेतच एक भग्नावशेष झालेला दरवाजा आढळतो. किल्ल्याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळकाच होय. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच १ मी. उंचीची हनुमान मूर्ती आपल्या नजरेस पडते. मूर्तीच्या मागच्या बाजूस एक निसर्गनिर्मित घळ आहे. यात १०० ते १५० माणसे सहज बसू शकतील. किल्ल्यातच दोन भलेमोठे सुळके आहेत आणि हा भलामोठा सुळका म्हणजेच गडमाथा होय.

सुळक्याला पूर्ण फेरी मारता येते पण काही ठिकाणी वाट पूर्णपणे ढासळलेली आहे. किल्ल्यावर पाण्याची एक दोन टाकी आहेत. किल्ल्यावरून संपूर्ण कोकण परिसर न्याहाळता येतो. कुर्डुगडाचे स्थान हे फार मोक्याच्या ठिकाणी आहे. पुण्याहून कोकणात येणाऱ्या ताम्हणी घाटाच्या वेशीवरच हा किल्ला आहे. किल्ल्याच्या मागच्या बाजूस रायगड, कोकणदिवा हे किल्ले आहेत. संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धातास पुरतो.

कुर्डुगड - विश्रामगड गडावर जाण्याच्या वाटा


किल्ल्यावर जाण्याचे मुंबईकडून आणि पुण्याकडून दोन्ही बाजूने मार्ग आहेत.

पुणे मार्गे: पुण्याहून मुळशी धरणाहून येणारा रस्ता ताम्हणी घाटमार्गे कोकणात उतरतो. ताम्हणी घाटातून एक रस्ता धाम्हणवळ मार्गे किल्ल्याच्या पठारावर येतो. जिते गावात उतरल्यावर ओढ्याच्याकाठाने थोडे पुढे जावे. थोड्याच अंतरावर एक प्रतिमा कोरलेला दगड आढळतो येथून डावीकडे वळावे. डावीकडची वाट शेतात जाते ती ५ मिनिटांनी समोरच्या डोंगराला येऊन मिळते. ही डोंगराची वाट सोडायची नाही. ती वाट पुढे वळणावळणाने पठारावर पोहचते. याच पठारवर ‘पेठवाडी’ नावाची वाडी आहे. जितेमधून इथपर्यंत येण्यास दीडतास पुरतो.

वाट फारच दमछाक करणारी आहे. धाम्हणवळ मधून येणारी वाट सुद्धा पेठवाडी गावात येऊन मिळते. पेठवाडी गावात एक छान कुर्डाई देवीचे मंदिर आहे. जवळच पाण्याचे टाके आहे. मंदिराच्या जवळूनच उजव्या बाजूने किल्ल्यावर जाणारी वाट आहे. येथून किल्ला वर जाण्यास अर्धा तास पुरतो.

मुंबई मार्गे: मुंबईहून एस.टी. ने किंवा कोकण रेल्वेने माणगावला यावे. माणगावातून जितेकडे जाणारी बस पकडावी आणि जिते गावात उतरावे. किल्ला हा एका डोंगरावर वसलेला आहे. जिते हे डोंगराच्या पायथ्याचे गाव आहे.

किल्ल्यावर असणाऱ्या घळीत राहण्याची सोय होते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. किल्ल्यावर बारमाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पेठवाडी गावातून अर्धातास लागतो.
मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.