Loading ...

एसएनडीटी नेतृत्वाचा सेवा गौरव

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव व प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रुबी ओझा यांचा सेवा गौरव.

एसएनडीटी नेतृत्वाचा सेवा गौरव

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव आणि प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रुबी ओझा यांचा सेवा गौरव समारंभ चर्चगेट कॅम्पसमध्ये पार पडला…

एसएनडीटी नेतृत्वाचा सेवा गौरव

स्वाती खंदारे (मराठीमाती डॉट कॉमच्या सह-संपादिका आणि छायाचित्रकार)

ठळक मुद्दे
  • एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव व प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रुबी ओझा यांच्या पाच वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर सेवा गौरव करण्यात आला.
  • मुंबईतील चर्चगेट कॅम्पसमधील पाटकर सभागृहात हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला.
  • प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांचे व उपक्रमांचे कौतुक केले.
  • या वेळी विद्यापीठ प्रशासनातील अधिकारी, मान्यवर आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मुंबई: एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव आणि प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रुबी ओझा यांच्या सेवा गौरव समारंभाचे आयोजन शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्या चर्चगेट कॅम्पसमधील पाटकर सभागृहात करण्यात आले.

पाच वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या विकासासाठी केलेल्या विविध उपक्रमांचे आणि प्रभावी नेतृत्वाचे यावेळी उपस्थित प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने साधलेल्या प्रगतीबद्दल उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

या वेळी प्रा. उज्वला चक्रदेव आणि प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रुबी ओझा यांनी कार्यकाळातील महत्त्वपूर्ण कामांचा आढावा घेत प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थिनींच्या सहकार्याबद्दल आभार मानले.

कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शिरीष चक्रदेव, व्यवस्थापन समितीचे सदस्य, सिनेट मेंबर, अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन डॉ. अनुराधा पोतदार यांनी तर आभार प्रदर्शन परीक्षा नियंत्रक डॉ. संजय नेरकर यांनी केले.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची