Loading ...

एसएनडीटीत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची भेट

एसएनडीटी पुणे कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या भेटीदरम्यान शिक्षण, संस्कृती व शाश्वत विकासावर संवाद.

एसएनडीटीत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची भेट

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या पुणे कॅम्पसमध्ये विविध देशांतील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी भेट देऊन शिक्षण, संस्कृती व शाश्वत विकासावर संवाद साधला…

एसएनडीटीत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची भेट

स्वाती खंदारे (मराठीमाती डॉट कॉमच्या सह-संपादिका आणि छायाचित्रकार)

ठळक मुद्दे
  • एसएनडीटीच्या पुणे कॅम्पसमध्ये फ्रान्स, स्पेन, इस्रायलसह विविध देशांतील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची विशेष भेट झाली.
  • विद्यार्थिनींनी गुरुकुल ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शाश्वत विकासातील योगदानावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गणेश वंदना, महर्षी कर्वे यांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफीत आणि मंगळागौरीचे प्रात्यक्षिक सादर झाले.
  • पाहुण्यांनी हेरिटेज वॉक करत कर्वे कुटीरला भेट देऊन महर्षी कर्वे यांच्या जीवनप्रवासाचा परिचय करून घेतला.

पुणे: एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या पुणे कॅम्पसमधील जानकी देवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च (JDBIMSR) येथे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या भेटीचे आयोजन करण्यात आले. ‘शिक्षण, संस्कृती आणि शाश्वत विकास’ या विषयावर आधारित या उपक्रमात फ्रान्स, स्पेन, इस्रायल, इटली, बेल्जियम, तैवान, थायलंड आणि दक्षिण कोरिया आदी देशांतील प्रतिनिधी आणि विद्यापीठातील विद्यार्थिनी यांच्यात संवाद व विचारांची देवाणघेवाण झाली.

हा उपक्रम एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू कर्नल डॉ. हेमलता बागला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. जेडीबीआयएमएसआरच्या संचालिका डॉ. रचना शिखरे यांनी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विभागाच्या वतीने, सर्वास इंडियाच्या सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले.

कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, पुणे कॅम्पस समन्वयक व एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्सचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण, जेडीबीआयएमएसआरच्या संचालिका डॉ. रचना शिखरे, सर्वास इंडियाच्या श्रीमती श्यामला देसाई, डॉ. रुपाली मेमाने, पीजीएसआर समन्वयक प्रा. सचिन देवरे, डॉ. महेश कोलतामे, डॉ. भास्कर इगावे, प्रा. सुभाष पाटील, प्रा. विलास जाधव तसेच श्री. कोरडे, श्री. मते, विद्यापीठातील विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थिनी व कर्मचारी उपस्थित होते. भारतीय परंपरेनुसार पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

जेडीबीआयएमएसआरच्या एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमातील विद्यार्थिनींनी भारतीय शिक्षणपद्धती—गुरुकुल ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP), भारतीय संस्कृती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शाश्वत विकासातील भारताचे योगदान यावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. या सादरीकरणानंतर विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी उत्स्फूर्त संवाद साधला. शिक्षण, संस्कृती, शाश्वत विकास, आंतरराष्ट्रीय अनुभव, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सहकार्यपूर्ण शिक्षण या विषयांवर विचारांची देवाणघेवाण झाली.

रूपक कलासदनच्या गुरु मानसीताई वझे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिष्यांनी गणेश वंदना हे भरतनाट्यम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या संप्रेषण आणि माध्यम अभ्यास विभागाने निर्मित केलेली महर्षी कर्वे यांच्या कार्याचा आणि वारशाचा परिचय करून देणारी सात मिनिटांची दृकश्राव्य चित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली.

कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विविध विशेष उपक्रमांची माहिती दिली. पुणे आवार प्रमुख डॉ. गणेश चव्हाण यांनी विद्यापीठातील सांस्कृतिक, शैक्षणिक आणि शाश्वत विकासाच्या उपक्रमांची माहिती दिली. सर्वास इंडियाच्या श्रीमती श्यामला देसाई यांनी भारतीय संस्कृती, विकास आणि सामाजिक संस्थांच्या योगदानाविषयी मनोगत व्यक्त केले.

दुपारनंतर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी पुणे कॅम्पसमध्ये हेरिटेज वॉक केला. यावेळी त्यांनी कर्वे कुटीरला भेट देऊन महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनप्रवास आणि कार्याचा परिचय करून घेतला. कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी भारतीय योगाच्या विविध पैलूंचे सादरीकरण तसेच महाराष्ट्राच्या पारंपरिक मंगळागौरी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

या आंतरराष्ट्रीय संवादामुळे प्रतिनिधींना भारतीय संस्कृती, शिक्षणपद्धती आणि शाश्वत विकासाचा दृष्टिकोन समजून घेण्याची संधी मिळाली. तसेच विद्यार्थिनींमध्ये जागतिक दृष्टिकोन, सांस्कृतिक जाणीव, आंतरराष्ट्रीय संवादकौशल्य आणि विविध देशांतील अनुभवांमधून शिकण्याची दृष्टी विकसित होण्यास या उपक्रमाची मदत झाली.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची