Loading ...

बेरोजगारीचा फूग्गा - ग्रामीण कथा (सागर बाबानगर)

मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे नोंदणीकृत सभासद लेखक सागर बाबानगर यांची ‘बेरोजगारीचा फूग्गा’ ही ग्रामीण कथा.

बेरोजगारीचा फूग्गा - ग्रामीण कथा (सागर बाबानगर)

शहरात नोकरी करून मोठं होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ‘राम्या’ नावाच्या एका भोळ्या ग्रामीण तरुणाचा संघर्ष आणि त्याच्या ‘बेरोजगारीचा फूग्गा’ फुटण्यापर्यंतचा रंजक प्रवास म्हणजे ही कथा...

बेरोजगारीचा फूग्गा

सागर बाबानगर (महाराष्ट्र, भारत)

प्रस्तावना
ग्रामीण भागातील साध्या-भोळ्या तरुणांच्या मनात शहराबद्दल एक अढळ आकर्षण असतं. ‘बेरोजगारीचा फूग्गा’ ही कथा अशाच एका रामेश्वर ऊर्फ राम्या नावाच्या पात्राभोवती फिरते, जो अभ्यासात कच्चा आणि स्वभावाने काहीसा धसमुसळा असला तरी डोळ्यांत मात्र शहरात जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची स्वप्नं बाळगून असतो. लग्न झाल्यानंतर पत्नी कमलीला सोबत घेऊन शहरात आलेल्या राम्याला तिथे पावलोपावली येणारे विचित्र अनुभव, घराशेजारील स्मशानामुळे निर्माण झालेली भीती आणि वारंवार सुटणारी नोकरी यांतून लेखकाने ग्रामीण आणि शहरी जीवनशैलीतील तफावत विनोदी ढंगाने मांडली आहे. ही कथा केवळ एका तरुणाच्या संघर्षाची नसून, ती मानवी चिकाटीची आणि नशिबाने दिलेल्या अनपेक्षित वळणाची एक हृदयस्पर्शी मांडणी आहे.

राम्या... म्हणजेच रामेश्वर भिकू हेंगणे! लहानपणापासून त्याचं एकच सपान - मोठ्या शहरात जायचं, तिथं जाऊन नोकरी करायची, मोठं व्हायचं अन् लै पैसा कमवायचा. पण गडी नुसती सपान बघणारा नव्हता. अभ्यासात मात्र त्याची गाडी जरा दमानंच होती. नववीत तर गड्याने चक्क नापास होण्याची ‘हॅट्ट्रिक’ केली होती. पण एकदाचा पास झाल्यावर आईनं गल्लीत गावजेवण घातलं होतं. गड्याची स्टाईलच वेगळी! चापून-चोपून केस विंचरायचे. नाक बसकं, त्यात तो चष्मा. दोन्ही डोळ्यांचा एकमेकांशी संबंध नसायचा; बघतोय कुणाकडं आणि बोलतोय कुणाशी याचा पत्ताच लागायचा नाही. पुढच्या दोन दातात फट असल्यानं बोलताना मधूनच शिट्टी वाजायची. याच शिट्टीमुळे एकदा परश्याच्या बायकोकडून त्यानं मारही खाल्ला होता. त्याचं म्हातारं (वडील) त्याच्यावर लै काव खाऊन असायचं. राम्या डोळ्यासमोर आला की शिव्या हासडायचं. म्हणायचं, “तुझ्या संगटच्या पोरांना पोरं झाली आणि तू गावात अजून बोंबलत फिरतोयस? कामधंद्याचं बघ काहीतरी!” राम्या हो-हो म्हणायचा आणि म्हातारं दिसलं की खोपच्यात जाऊन लपायचा. पारावर बसल्यावर म्हादू आज्जानं तंबाखू मळता मळता म्हाताऱ्याजवळ लग्नाचा विषय काढला. आज्जा म्हणाला, “लगीन करून दे त्याचं, त्याशिवाय हे उंडगं सुधरायचं नाही.” म्हातारं खेकसून म्हणालं, “या डुचक्याला कोण मुलगी देणार? कुणाची बिशाद हाय व्हय?” तेव्हा आज्जानं सुचवलं, “आमच्या लांबच्या पाहुण्यांत एक पोरगी हाय - कमला. भीमाच्या बायकोच्या आत्याची धाकली लेक. लय गुणाची हाय. शहरात भीमाची ओळख हाय, तिथं याच्या पोटापाण्याचं बघता येईल.” म्हातारं तयार झालं. ‘यादी पे शादी’ ठरली. राम्याला तर लॉटरी लागल्यागत झालं. लग्नाच्या दिवशी राम्या चमकत होता. डोक्यावर बाटलीभर तेल ओतून चापून भांग पाडला होता, तोंडाला पावडर फासली होती. नवीन कपडे, नवीन चपल्या... मिजास दांडगी होती! पक्या, मन्या, किश्या, मल्ल्या सगळी दोस्तमंडळी पंगतीवर ताव मारायला आली होती. लग्नात भटजी जाम वैतागले. राम्या भटजींकडं बघतोय का कमलाकडं, हेच कळेना! भटजींनी “वधूचा हात हातात घ्या” म्हटल्यावर यानं भटजींचाच हात धरला. आईनं टोकल्यावर तो लाजून गप्प बसला. एकदाचं लगीन लागलं. आईच्या डोळ्यात पाणी आलं; चला, सगळं नीट पार पडलं. लगीन झाल्यापासून राम्या थोडा शांत झाला. उंडारणे कमी झाले, घरच्या कामात मदत करू लागला. कमलानं भीमाला शहरात राहण्याची सोय करायला सांगितली होती. एक दिवस भीमा आला अन् म्हणाला, “राम्या, माझ्या दोस्ताचा फ्लॅट हाय तिथं सोय झालीय.” आईनं विचारलं, “फ्लॅट म्हणजे काय रे?” भीमानं सांगितलं, “तिथं दहा-दहा मजली घरं असतात, जमिनीवर आरश्यासारख्या पांढऱ्या फरश्या असतात.” त्याने एक चुरगाळलेला कागद राम्याच्या हातात ठेवला, “हा पत्ता हाय, माझा दोस्त नोकरीचं बघून घेईल.” जायचा दिवस उजाडला. बाजरीच्या भाकऱ्या, चटणी, लोणचं असा शिधा बांधून दिला. आईचं हृदय जड झालं होतं, म्हाताऱ्यानेही “कमलीकडं लक्ष दे” म्हणून बजावलं. अख्खं गाव वेशीपर्यंत सोडायला आलं होतं. जनू मास्तरनंतर शहरात नोकरीला जाणारा हा दुसराच गडी होता! एसटीत चढताना सवयीप्रमाणे राम्यानं कमलीचा हात सोडून परश्याच्या बायकोचा हात धरला! परश्या ओरडला, “अरे, काय करतोयस? जाता-जाता मार खायचाय का?” म्हातारं कपाळावर हात मारून म्हणालं, “पांडुरंगा, तूच सांभाळ आता हिला!” प्रवासात एका म्हातारीनं कमलीला शहरातल्या लोकांपासून सावध केलं, तर एका लहान पोरानं राम्याच्या कानसुलीत लगावली. कसाबसा प्रवास संपवून रात्री नऊला ते राजापूरला उतरले. रिक्षावाल्यानं ‘एफ. सी. वाघबकरे’ यांच्या घरी सोडलं. ते घर दोन मजली आणि प्रशस्त होतं. फुलचंद चिमाजी वाघबकरे (एफ. सी.) नावाच्या आडदांड माणसाने त्यांचं स्वागत केलं. राम्यानं त्यांच्या बायकोचं नाव ‘सुंद्री’ ऐकलं आणि शिट्टी वाजली! फुलचंद काका चिडले, पण राम्यानं दातातील फट दाखवून आपली अडचण सांगितली. त्यांना वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये नेलं. तो आलिशान फ्लॅट बघून राम्या आणि कमली हरखून गेले. पण सकाळी उठून गॅलरीत गेल्यावर राम्याची बोबडीच वळली! समोरच स्मशान होतं आणि तिथे एक विचित्र दिसणारं म्हातारं राखेत काहीतरी शोधत होतं. राम्या घाबरून आत पळाला. ‌ पुढचे काही दिवस विचित्र गेले. रात्रीच्या वेळी खिडकीतून “वूऽऽ वूऽऽऽ” असा भयाण आवाज यायचा. राम्याला वाटलं भूतच आहे! बाळू परीटाच्या सांगण्यावरून त्याने एका ‘पुंगीवाले बाबां’ना बोलावून अंगारा लावला, कोंबडंही कापलं, पण आवाज काही थांबेना. शेवटी फुलचंद काका गावाहून परतले. त्यांनी हसत हसत गुपित उलगडलं. तो आवाज भूताचा नसून, स्लायडिंग खिडकी थोडी उघडी राहिल्यावर जोरात येणाऱ्या वाऱ्याचा होता! राम्या आणि कमलीचा चांगलाच ‘पचका’ झाला होता. आता सुरू झाला नोकरीचा शोध. आधी फुलचंदच्या ओळखीनं एका हातमाग फॅक्टरीत काम मिळालं, पण राम्यानं घाईघाईत मशीनमध्ये पोतं आडवं घातल्यानं मशीन बंद पडलं आणि त्याची नोकरी गेली. घरचा शिधा आणि पैसे संपत आले होते. कमलीने धीर दिला, ती सुंद्री काकूंच्या मशीनवर शिलाई काम करू लागली. नंतर एका डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये राम्याला ‘रिसेप्शनिस्ट’ म्हणून काम मिळालं. पण तिथले डॉक्टर ‘बिनडोळे’ यांना कुणीतरी सांगितलं की, “तुमच्या रिसेप्शनिस्टच्या तिरळ्या नजरेमुळे पेशंट घाबरून पळून जातात!” तिथूनही त्याची हकालपट्टी झाली. राम्या पूर्णपणे खचला. नदीच्या कठड्यावर बसून त्याने जीवाचं बरं-वाईट करायचं ठरवलं. “कमलीला काय तोंड दाखवू? गाव काय म्हणेल?” या विचारानं तो उडी मारणार इतक्यात एका लहान मुलाचा पाण्यात पडल्याचा आवाज आला. राम्या पट्टीचा पोहणारा होता. स्वतःचा जीव देण्याचा विचार बाजूला सारून त्याने नदीत उडी घेतली आणि त्या मुलाला सुखरूप बाहेर काढलं. तो मुलगा एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याचा होता. कृतज्ञतेपोटी त्या साहेबांनी राम्याला विचारलं, “काय पाहिजे तुम्हाला?” राम्या ताडकन म्हणाला, “नोकरी!” राम्याला त्यांच्या फार्महाऊसवर देखरेखीची नोकरी मिळाली. सरकारी बक्षीस मिळालं, गावात मिरवणूक निघाली. राम्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि त्याच्या ‘बेरोजगारीचा फूग्गा’ एकदाचा फुटला होता!

अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची