Loading ...
/* Dont copy */

पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी (मराठी टिव्ही)

स्टार प्रवाहच्या माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमातून आदेश बांदेकर घेऊन येणार पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी.

पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी

प्रेक्षकांना घरबसल्या अनुभवता येणार पंढरीची वारी आणि भक्तीचे अलौकिक किस्से...

पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी

मराठीमाती संपादक मंडळ

पंढरीची वारी दरवर्षी न चुकता करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. काहीजण संसाराच्या व्यापातून वेळ काढत ते जमवून आणतात. काहींना मात्र ते शक्य होत नाही. ज्यांना वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही त्यांच्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन येतेय वारी विशेष कार्यक्रम माऊली महाराष्ट्राची. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आदेश बांदेकरांसोबत ही पंढरीची वारी अनुभवता येणार आहे.

पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी (मराठी टिव्ही)
पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी (मराठी टिव्ही)

माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमाचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘विठु माऊलीची वारी स्टार प्रवाहच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवता येईल हे पुण्याचं काम आणि अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आदेश बांदेकरांसोबत अख्खा महाराष्ट्र दुमदुमून जाईल यात शंका नाही. स्टार प्रवाह वाहिनीकडून सर्व रसिकांना आणि भक्तांना हे मनापासून अर्पण करतोय.’

या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना आदेश बांदेकर म्हणाले, ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस अशीच काहीशी माझी भावना आहे. याआधी वारीत सहभागी झालोय पण पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर अशी संपूर्ण वारी करण्याचा योग स्टार प्रवाह वाहिनीमुळे जुळून आला आहे. लक्ष्य मालिकेमुळे निर्माता होण्याची संधी स्टार प्रवाह वाहिनीने दिली आणि आता या नव्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारीची अनुभूती घरबसल्या प्रेक्षकांना देण्याची जबाबदारीही सोपवली आहे. संतांची शिकवण, वारकऱ्यांचे अनुभव, भक्तीचं रूप, आणि संपूर्ण महाराष्ट्रात होणारा भक्तीमय उत्सव माऊली महाराष्ट्राची या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हाती घेतलेलं हे कार्य सुफळ संपूर्ण व्हावं हेच पांडुरंगाच्या चरणी मागणं आहे अशी भावना आदेश बांदेकर यांनी व्यक्त केली.’

पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी (मराठी टिव्ही)
पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी (मराठी टिव्ही)

माऊली महाराष्ट्राची हा कार्यक्रम महाराष्ट्रातील महान धार्मिकसंस्कृतीचा, संतपरंपरेचा, विशेषतः पंढरपूर वारीचा, भावनिक आणि सांस्कृतिक प्रवास उलगडत जाईल. प्रत्येक भागात वारीचा एक एक पैलू समोर येईल. वारकऱ्यांच्या दिंड्या, पायी चालण्यामागचं भक्तीचं तत्त्वज्ञान, महिला वारकरींची भूमिका, विध्यार्थी आणि तरुणांचा सहभाग, पालखीचा बैलरथ, भक्तीचं रिंगण, माऊलीचा अश्व, पर्यावरणपूरक वारी, सुश्रुषावारी, अन्नपूर्णा वारी, कर्तव्यवारी, सेवावारी, वारीतले पुंडलिक, वारीतले लक्ष्मी-नारायण, बंधूभेट हा संपूर्ण अनुभव माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडत जाईल. आदेश बांदेकरांसोबत आणि स्टार प्रवाह वाहिनीच्या माध्यमातून घरी बसलेल्या प्रत्येकाला आपण वारीत आहोत, वारीत चालण्याचा अनुभव घेत आहोत, आपल्या घरीच पंढरीची वारी आली आहे याची अनुभूती नक्की येईल. तेव्हा पाहायला विसरु नका माऊली महाराष्ट्राची २३ जूनपासून सायंकाळी सहा वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

मराठी टिव्ही संबंधी इतर लेखन वाचा:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची