Loading ...

अजूनही आठवतंय मला (मराठी कविता)

अजूनही आठवतंय मला (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री प्रिती चव्हाण यांची अजूनही आठवतंय मला ही मराठी कविता.

अजूनही आठवतंय मला (मराठी कविता)

अजून ही आठवते मला, आपली पहिली भेट


अजूनही आठवतंय मला (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ‘प्रिती चव्हाण’ यांची ‘अजूनही आठवतंय मला’ ही मराठी कविता.



अजून ही आठवते मला,
आपली पहिली भेट...
तुझी ती पाखरांवनी,
भिरभिरणारी नजर...
अन्‌ तुझे ते अबोलपणे बोलणारे डोळे,
‍अजूनही आठवतंय मला...
तुझ्या नजरे आडचे,
माझे मागे मागे फिरणे...
अन्‌ कशाची तरी चाहूल लागताच,
तुझे मागे वळून बघणे...
अजूनही आठवतंय मला...
तुझ्या पाठीवरील ती,
गुंफलेली लांबसडक वेणी...
अन्‌ त्यात माळलेला मोगऱ्याचा गजरा...
अजूनही आठवतंय मला...
तूझ्याशी बोलण्याची ती धडपड,
अन्‌ मनातल्या मनात होणारी घालमेल...
अजूनही आठवतंय मला...
मी प्रत्यक्षात येताच,
तुझी नमलेली नजर...
अन्‌ ओठी आलेले पण,
तू निमूटपणे गिळलेले शब्द...
अजूनही आठवतंय मला...

- प्रिती चव्हाण

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची