Loading ...

दुपार - मराठी कविता (सदानंद रेगे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी सदानंद रेगे यांची दुपार ही लोकप्रिय मराठी कविता.

दुपार - मराठी कविता (सदानंद रेगे)

माथ्यावरती उन्हे चढावी, पावलांत सावल्या विराव्या


दुपार - मराठी कविता (सदानंद रेगे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी सदानंद रेगे यांची दुपार ही लोकप्रिय मराठी कविता.



माथ्यावरती उन्हे चढावी
पावलांत सावल्या विराव्या
घाटावरती शुभ्र धुण्यांच्या
पाकोळ्या अन् मंद झुलाव्या

डोंगर व्हावे पेंगुळलेले
पोफळबागा सुस्त निजाव्या
अंगणातल्या हौदावरती
तहानलेल्या मैना याव्या

लुकलुकणारे गोल कवडसे
लिंबाच्या छायेत बसावे
खारीचे बावरे जोडपे
बकुळीखाली क्षणिक दिसावे

कुरणाच्या हिरवळीत ओल्या
ऊनही हिरवे होऊन जावे
कुठे कधीचे नांगरलेले
शेत पावसासाठी झुरावे

- सदानंद रेगे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची