Loading ...
/* Dont copy */

अमर हुतात्मे झाले - मराठी कविता (वि. म. कुलकर्णी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वि. म. कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी) यांची अमर हुतात्मे झाले ही लोकप्रिय मराठी कविता.

अमर हुतात्मे झाले - मराठी कविता (वि. म. कुलकर्णी)

ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले


अमर हुतात्मे झाले - मराठी कविता (वि. म. कुलकर्णी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वि. म. कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी) यांची अमर हुतात्मे झाले ही लोकप्रिय मराठी कविता.



ते देशासाठी लढले
ते अमर हुतात्मे झाले

सोडिले सर्व घरदार
त्यागिला मधुर संसार
ज्योतीसम जीवन जगले
ते देशासाठी लढले

तो तुरुंग, ते उपवास
ते साखळदंड तनूस
कुणी फासावरती चढले
ते देशासाठी लढले

झगडली-झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली माता
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले

कितिकांनी दिले प्राणास
हा विसरु नका इतिहास
पलित्याची ज्वाला झाले
ते देशासाठी लढले

हा राष्टध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला
जयगीत गाऊया अपुले
ते देशासाठी लढले

- वि. म. कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची