Loading ...
/* Dont copy */

शेतकरी आणि त्याची मुले (इसापनीती कथा)

शेतकरी आणि त्याची मुले (इसापनीती कथा) - प्रत्यक्ष पैसा मिळाला म्हणजेच द्रव मिळाले असे समजू नये ही शिकवण इसापनीती कथा शेतकरी आणि त्याची मुले.

शेतकरी आणि त्याची मुले (इसापनीती कथा)

प्रत्यक्ष पैसा मिळाला म्हणजेच द्रव मिळाले असे समजू नये ही शिकवण देणारी इसापनीती कथा शेतकरी आणि त्याची मुले


शेतकरी आणि त्याची मुले (इसापनीती कथा)

प्रत्यक्ष पैसा मिळाला म्हणजेच द्रव मिळाले असे समजू नये ही शिकवण देणारी इसापनीती कथा शेतकरी आणि त्याची मुले.



एक म्हातारा शेतकरी अगदी मरावयास टेकला, तेव्हा त्याने आपल्या सगळ्या मुलांस जवळ बोलावून सांगितले की, ‘मुलांनो, मी माझी सगळी शेते आणि बागा तुमच्या स्वाधीन करीत आहे. ह्या जमिनीत कोठे तरी पैसा पुरलेला असून तो हातभर जमीन खणली असता मिळेल.’ इतके बोलून तो शेतकरी मरण पावला.

त्याच्या मुलांस वाटले की, आपल्या बापाने पुष्कळसे द्रव्य शेतात कोठे तरी पुरून ठेवले असावे. मग ते द्रव्य मिळविण्याच्या इच्छेने त्यांनी सगळी शेते चांगली खोल खणून पाहिली, परंतु द्रव्य सापडले नाही.

तथापि जमीन चांगली खणून निघाल्यामुळे, त्या वर्षी शेतात पुष्कळच चांगले पीक आले. ते पाहताच, आपल्या बापाच्या सांगण्याचा अर्थ काय होता हे त्या मुलांच्या चांगले लक्षात आले व त्यानंतर त्यांनी जमिनीची चांगली मशागत करण्याचा क्रम चालू ठेवला.

कथेचे तात्पर्य - प्रत्यक्ष पैसा मिळाला म्हणजेच द्रव मिळाले असे समजू नये. धान्य पुष्कळ मिळाले तर तीही संपत्तीच होय असे समजण्यास हरकत नाही.


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची