Loading ...

अशाच एका सायंकाळी (मराठी कविता)

अशाच एका सायंकाळी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी मुकुंद भालेराव यांची अशाच एका सायंकाळी ही कविता.

अशाच एका सायंकाळी (मराठी कविता)

अशीच तिथे घरे होती, वहात होती गार हवा


अशाच एका सायंकाळी (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी मुकुंद भालेराव यांची कविता ‘अशाच एका सायंकाळी’.



अशीच तिथे घरे होती
वहात होती गार हवा
मुले अशीच खेळत होती
पहात होती निलनभा

उंच होते हिरवे डोंगर
सभोवताली शुभ्र आभा
मन माझे हे थिरकत होते
पहात होतो दिव्य प्रभा

सुंदर लोभस शांत सरीता
संथपणे ती वाहत होती
चिवचिवणारे सुंदर पक्षी
घेऊन प्रेम वाहत होती

नदीकिनारी छोटे मंदिर
भजनाचे संगीत असे
मनामनाच्या अंतरातही
दिव्यत्वाचे भाव वसे

सायंकाळी गाभार्यातून
मंदज्योतिची रंगफुले
दिव्यगान कुणी गाताना मग
मनी भक्तिचे प्रेमफुले

एक तपस्वी गौर तरुणी
शांत माधवा आठविते
मधुर मधुर ती आर्तस्वराने
प्रिय गोविंदा साठविते

मीपण माझे हरवुन गेलो
नदीकिनारी गाव असे
गावामधल्या समस्त गोपी
नाचत येता शाम दिसे

रामामधला शाम निराळा
गोपीसाठी रास रचे
शामामधला राम निराळा
सितेला तो प्रिय असे

राधामाधव मधुर मानसी
प्रेमाचे स्वरपुष्प जसे
सितासिता वनी भटकता
रामाचे निजरुप दिसे

- मुकुंद भालेराव

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची