Loading ...

सापशिडीचा खेळ (मराठी कविता)

सापशिडीचा खेळ (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी शेषाद्री नाईक यांची सापशिडीचा खेळ ही कविता.

सापशिडीचा खेळ (मराठी कविता)

सापशिडीचा खेळ खेळताना वाटलं होतं, शिड्याच येतील आपल्या वाट्याला, पण


सापशिडीचा खेळ (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी शेषाद्री नाईक यांची सापशिडीचा खेळ ही कविता.



सापशिडीचा खेळ खेळताना वाटलं होतं
शिड्याच येतील आपल्या वाट्याला
पण साप आलेच

सापांचेही धन्यवाद यासाठी की
त्यांनी खाली का होईना
पण न दुखावता सोडलं
पुन्हा डाव खेळण्यासाठी
मग पुन्हा उभारी घेतली
होत्या नव्हत्याचा हिशोब केला
आणि फासे टाकले

यंदा मात्र तयार होतो
हातात कुऱ्हाड घेऊन
मग साप भेटल्यावर चार हात केले
कधी साप मेले
कधी कुऱ्हाडच डोक्यावर पडली

मग खेळाची खरी मजा आली
फासे टाकत गेलो
शिडी वरूनही धडपडलो
सापांचीही दोस्ती केली कधी

शंभरच्या आकड्याकडे न बघता
आजही फासे टाकतच आहे
मग साधा चौकोन येवो
शिडीचा तळ किंवा सापाचे तोंड

- शेषाद्री नाईक

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची