Loading ...
/* Dont copy */

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात पिक्चरवाली दिवाळी

पिक्चरवाली दिवाळी - प्रवाह पिक्चर पुरस्कार २०२२ मध्ये दिवाळीच्या आधीच साजरी होणार पिक्चरवाली दिवाळी.

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात पिक्चरवाली दिवाळी

प्रवाह पिक्चर पुरस्कार २०२२ मध्ये दिवाळीच्या आधीच साजरी होणार पिक्चरवाली दिवाळी


प्रवाह पिक्चर पुरस्कार

प्रवाह पिक्चर पुरस्कार २०२२ ची उत्सुकता. दिवाळीच्या आधीची पिक्चरवाली दिवाळी एकत्र होणार साजरी.


दिवाळीच्या सणासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र प्रवाह पिक्चर पुरस्कारांच्या रुपात दिवाळीआधीच पिक्चरवाली दिवाळी साजरी होणार आहे. प्रवाह पिक्चर पुरस्कारांचं यंदाचं हे पहिलं वर्ष.

मराठी परंपरेचं प्रतीक असणाऱ्या सन्मानचिन्हापासून ते अगदी मराठमोळ्या गाण्यांपर्यंत अस्सल मराठी मनोरंजनाची मेजवानी देणारा हा सोहळा येत्या रविवारी म्हणजेच १६ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात पिक्चरवाली दिवाळी
प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात पिक्चरवाली दिवाळी

चित्रपटातील सर्वोत्त्तम कलाकृतींचा सन्मान, सोबतीला फराळा इतकाच खमंग कॉमेडीचा तडका आणि फटाक्यांच्या आतषबाजीप्रमाणे लखलखते कलाकारांचे परफॉर्मन्स या सोहळ्याची शान वाढवणार आहेत.

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात आपल्या अष्टपैलू अभिनयाने सर्वांना आनंद देणाऱ्या अभिनय सम्राट अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला.

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात पिक्चरवाली दिवाळी
प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात पिक्चरवाली दिवाळी

याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते अशोक सराफ यांना गौरवण्यात आलं.

या प्रसंगी अशोक मामांचा सन्मान करण्याचं भाग्य मिळालं हाच माझा मोठा सन्मान आहे अशी भावना रितेश देशमुख यांनी व्यक्त केली.

विशाखा सुभेदार आणि सिद्धार्थ जाधव
विशाखा सुभेदार आणि सिद्धार्थ जाधव

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात उमेश कामत, वैदेही परशुरामी, रुपाली भोसले आणि रसिका सुनिलच्या रोमॅण्टिक अंदाजासोबतच उर्मिला कोठारे, संस्कृती बालगुडे आणि माधवी निमकरची ठसकेबाज लावणी पाहायला मिळेल.

तर सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या नृत्यातून चित्रपट सृष्टीमधील हरहुन्नरी व्यक्तिमत्व ‘दादा कोंडके’ यांना मानवंदना देणार आहे.

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात पिक्चरवाली दिवाळी
प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात पिक्चरवाली दिवाळी

आदर्श शिंदे आणि छोट्या उस्तादांचं धमाकेदार गाणं आणि सिद्धार्थ जाधव-विशाखा सुभेदार यांचं बहारदार सूत्रसंचालन या सोहळ्याची रंगत आणखी वाढवणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांचा अनोखा अंदाज देखील या सोहळ्यात पाहायला मिळेल.

तेव्हा मराठी सिनेविश्वातील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगलेला हा रंगारंग सोहळा पाहायला विसरु नका रविवार १६ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चर वाहिनीवर.


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची