Loading ...
/* Dont copy */

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा २०२२

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा २०२२ रेड कार्पेटवर कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज.

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा २०२२

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा २०२२ रेड कार्पेटवर कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज


प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा २०२२

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा २०२२ रेड कार्पेटवर कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज. (Pravah Picture Puraskar Sohala 2022)


डिस्ने स्टार नेटवर्कची प्रवाह पिक्चर ही मराठी चित्रपटांची वाहिनी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. दर्जेदार मराठी सिनेमांची मेजवानी सादर करत असतानाच प्रवाह पिक्चर वाहिनी भेटीला घेऊन येणार आहे प्रवाह पिक्चर पुरस्कार २०२२. मराठी कलाविश्वातील दिग्गजांच्या उपस्थितीत नुकताच प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा २०२२ पार पडला.

या सोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली. प्रवाह पिक्चर पुरस्कारांचं हे पहिलंच वर्ष. मराठी सिनेमे, त्यातील कलाकार, तंत्रज्ञ मंडळी यांच्या चमकदार कामगिरीची दखल घेणारा हा सोहळा लवकरच प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट गायक-गायिका, सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संकलक, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञ, सर्वोत्कृष्ट ध्वनीयोजना, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट रंगभूषा, सर्वोत्कृष्ट साहसदृश्य दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पात्र योजना, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार (पुरुष-स्त्री) आणि सर्वोत्कृष्ट खलनायक, प्रवाह पिक्चर विशेष पुरस्कार, अश्या विभागांमध्ये पुरस्कार जाहीर करण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्याच्या परीक्षणाची जबाबदारी पार पाडली आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक किरण यज्ञोपोवित, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, ज्येष्ठ छायाचित्रकार महेश आणे, ज्येष्ठ पत्रकार-लेखक श्रीकांत बोजेवार. प्रवाह पिक्चर वाहिनीवर लवकरच प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा पाहायला मिळणार आहे.


प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा २०२२ (व्हिडिओ)




मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची