सुशिक्षित श्वानप्रेमी - व्यंगचित्र

सुशिक्षित श्वानप्रेमी, व्यंगचित्र - शहरभर हागणदारी वाढविणाऱ्या सुशिक्षित श्वानप्रेमींना समर्पित व्यंगचित्र.
सुशिक्षित श्वानप्रेमी - व्यंगचित्र
व्यंगचित्र: अमित पापळ
मुक्या जनावरांवर प्रेम करावे, त्यांच्यावर दया दाखवावी हे वैश्विक सत्यच आहे!
पण, जे सुशिक्षित श्वानप्रेमी आहेत आणि जे दररोज न चुकता शहरातील रस्ते-उद्यानांमध्ये “हागणदारी” वाढवत असतात त्याचे काय?

तुम्ही अगदी आवडीने श्वान पाळा, त्यांचे लाड करा, हौस पुरवा! पण, म्हणून शहरातील सार्वजनिक रस्ते, जागा, फुटपाथ अगदी राजरोसपणे मलिन करायचे अधिकार तुम्हाला कोणी दिले?

आपले स्वच्छ आणि सुंदर शहर मलिन करण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नाहिये. बरेचसे श्वानप्रेमी स्वच्छतेचे काटेकोरपणे नियम पाळतातही; पण, शहरातील रस्ते, फुटपाथांची एकुण अवस्था बघता स्वच्छतेचे नियम पाळणाऱ्यांची संख्या ही खुपच कमी आहे; हे तितकेच खरे!

आपले शहर, गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपल्या सारख्या सामान्य नागरिकांची प्रार्थमिक जबाबदरी आहे. ती आपण प्रामाणिकपणे पाळली तर खरंच आपला देश एक दिवस जगात सर्वांग सुंदर होईल!

- अमित पापळ

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.