लता मंगेशकर अमर आहेत; त्या गेल्या नाहीत...
त्या अमर आहेत..त्या गेल्या नाहीत... अगदी दिवसाची सुरुवात प्रभातगीतं,भुपाळी,मंत्रामध्ये त्या आहेत.आयुष्या सुरुवात जन्मदिनांच्या गाण्यामधे त्या आहेत.
बालगीतामधे, बारश्याच्या, साखरपुड्याच्या, लग्नाच्या, मधुचंद्राच्या गाण्यांमधे त्या आहेत..
तारुण्यातील प्रेमगीतांमधे त्या आहेत, देशाच्या देशभक्ती मधे त्या आहेत, देवाच्या भक्तीगीतांमधे त्या आहेत, ऐतेहासिक गाण्यांमधे त्या आहेत, लहानग्यांच्या बडबडगीतां मधे त्या आहेत.
चिरतरूण तरुणीच्या कंठात त्या आहेत, आज्जी-पणजींच्या मंत्रोच्चारात त्या आहेत.
साक्षात सरस्वतीच्या आवतार त्या आहेत; त्या इथेच आहेत, त्या सदैव इथेच राहणार.
त्या चिरंजीवी आहेत...!! त्या चिरंजीवी आहेत...!!!
स्वरमाउली....!! स्वरमाउली...!!!
- अमित पापळ