गावातून शहरात आलो तूटली गावची वाट
गावातून शहरात आलो
तूटली गावची वाट
आज कोरोनाच्या वायरसच्या धासतीने
धरली पुन्हा गावची वाट
गावातून शहरात आलो
विसरलो गावची नाती गोती
आज कोरोनाच्या धासतीने
आठवली पुन्हा गावची नाती गोती
आई वडीला पासुन
रक्ताच्या नात्यापासुन
आलो शहरात
आजही तेवढेच प्रेम आहे
आईच्या हृदयात
धावपळीच्या काळात
विसरलो गावची माती
कोरोनाच्या धासतीने
पुन्हा आठवली गावची नाती
कुन्हा सोबत बोलन्यास
अम्हास नव्हता वेळ
कोरोना वायरच्या धासतीने
जुळला पुन्हा मेळ
विसरले नाती गोती
आठऊ लागली आज
कोरोना वायरच्या धासतीने
आठवली गावची वाट
कोरोना वायरसच्या धासतीने
आठवली गावची वाट
- दिनेश लव्हाळे