मी चाललो शोधण्यास मला, कोण मी आणी मी कुठला
मी चाललो शोधण्यास मलाकोण मी आणी मी कुठला
कुठून मी आलो
आणि कोणाच्या मदतीला
जिथे न कोणी गेले
तिथे मला जावेसे वाटते
जे न कोणी केले
ते मला करावेसे वाटते
मनात अनेक स्वप्नांचं झाड आहे
त्या झाडाला फुले लागणार का
जीवन जगणे कश्यासाठी
जगण्याचा नवा अर्थ आता कळेल का
दिशा आहे अनेक आता
नवी दिशा दिसेल का
कस्तुरी मृगा सारखा पळत सुटलो
मला कोणी थांबवणार का
सुर्य दिवसा तर चंद्र रात्री उगवतो
दोघेही येणार का एकत्र प्रकाश द्यायला
अशक्य ते शक्य करून
मी ही शोधणार स्वतःला