Loading ...

तू तर उत्कट उल्का - मराठी कविता

तू तर उत्कट उल्का, मराठी कविता - [Tu Tar Utkat Ulka, Marathi Kavita] तेजस्वी ताऱ्यांचे जंगल, तू तर उत्कट उल्का, काजळ कोरीत जणू उतरे ती लखलखती रेखा.

तेजस्वी ताऱ्यांचे जंगल, तू तर उत्कट उल्का

तेजस्वी ताऱ्यांचे जंगल, तू तर उत्कट उल्का
काजळ कोरीत जणू उतरे ती लखलखती रेखा
ओलांडूनी ताऱ्यांचे अंगण, तप्त लोळ तो उरी
मस्तक फोडून शिखरावर जणू उतरे दिपशिखा ॥धॄ॥

भेट व्हावया जिवा-शिवाची क्रमिली तू अंतरे
भेटीमधूनी सरले अंतर, उरले दिव्य खरे
जटांमधूनी सुटूनी जणू, ललकारी भगीरथा
तेजस्वी ताऱ्यांचे जंगल, तू तर उत्कट उल्का ॥१॥

जगणे-मरणे, मरणे-जगणे ही भाग्याची लेणी
जगण्यास्तव पण किती चुकविशी दैवाची देणी
पूर्णामधुनी पूर्ण वगळूनी, पूर्ण तू नायिका
तेजस्वी ताऱ्यांचे जंगल, तू तर उत्कट उल्का ॥२॥

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची