Loading ...
/* Dont copy */

राजधेर किल्ला

राजधेर किल्ला - [Rajdher Fort] ३५५५ फुट उंचीचा राजधेर किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेतील राजधेर किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने कठीण समजला जातो.

राजधेर किल्ला - Rajdher Fort

राजधेर गडमाथ्यावरून मांगी तुंगी, न्हावीगड, कोळधेर, इंद्राई, धोडप असा सर्व परिसर दिसतो

राजधेर किल्ला - [Rajdher Fort] ३५५५ फुट उंचीचा राजधेर किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेतील राजधेर किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने कठीण समजला जातो. नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवडपर्यंत येऊन संपते.

पुढे तीच मनमाडच्या जवळ असणाऱ्या अंकाईच्या पर्यंत जाते. याच रांगेला अजंठा-सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात ४ किल्ले येतात. राजधोर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड.

राजधेर किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


राजधेर किल्ल्यावर प्रवेश करताना पहिल्या प्रवेशद्वाराच्या डावीकडच्या कमानीवर एक फारसीतील शिलालेख आहे. येथून गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. गडमाथ्यावर पोहचल्यावर समोरच दोन वाटा फुटतात एक डावीकडे जाणारी तर दुसरी उजवीकडे जाणारी. आपण उजवीकडची वाट पकडायची, थोडे पुढे गेल्यावर एक वाडा लागतो. आजही वाडा चांगल्या स्थितित उभा आहे.

या वाड्याशिवाय येथे बघण्यासारखे काही नाही. परत फिरून आता डावीकडची वाट पकडायची. या वाटेवरून थोडे पुढे गेल्यावर एक कातळात खोदलेली गुहा लागते. या गुहेत उतरण्यासाठी एक शिडी लावलेली आहे. येथे सध्या एका बाबांचे वास्तव्य असते. गुहेच्या वरच्या भागावर एक घुमटाकार कमान असलेली विहिर आहे. येथून परत थोडे पुढे गेल्यावर आणखी एक गुहा लागते. या गुहे समोरून पुढे जाणारी वाट तलावापाशी घेऊन जाते. तलावाच्या काठावर एका गुहेत महादेवाचे मंदिर आहे.

तलावाच्या कडेकडेने जाणाऱ्या वाटेने आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो. वाटेत अनेक भुयारी टाकी आढळतात. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर एक तलाव आहे. गडमाथ्यावरून मांगी तुंगी, न्हावीगड, कोळधेर, इंद्राई, धोडप असा सर्व परिसर दिसतो. गडमाथा फिरण्यास २ तास पुरतात.

राजधेर गडावर जाण्याच्या वाटा


राजधेरवाडी मार्गे: राजधेरवर जाण्यासाठी एकच मार्ग आहे. नाशिक किंवा मनमाड मार्गे चांदवड गाठावे. नाशिक पासून चांदवड ६४ कि.मी. वर आहे तर मनमाड पासून चांदवड २४ कि.मी. वर आहे. चांदवड मधून एस.टी. ने राजधेरवाडी गाठावी. राजधेरवाडी हे पायथ्याचे गाव आहे. राजधेरवाडीतून गडावर जाण्यास ठळक वाट आहे. गावातून किल्ल्यावर जातांना आपण एका कातळकड्यापाशी पोहचतो.

येथून वर जाण्याच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. पण सध्या तिथे एक शिडी लावली असल्यामुळे आपण गडाच्या प्रवेशद्वारात पोहचू शकतो. अन्यथा प्रवेशद्वारापर्यंत पोहचण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते. राजधेरवाडीतून इथपर्यंत पोहचण्यास दीड तास लागतो.

किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे. यात १० लोकांची सोय होते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. किल्ल्यावर बारमाही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी गावातून दीड तास लागतात.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची